Lokrakshanay
Friday, July 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home Uncategorized

दणक्यात एन्ट्री करत ‘बॉर्डर २’ ने बिग बजेट चित्रपटांचे मोडले रेकॉर्ड!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 24, 2026
in Uncategorized, मनोरंजन
दणक्यात एन्ट्री करत ‘बॉर्डर २’ ने बिग बजेट चित्रपटांचे मोडले रेकॉर्ड!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : देशभक्तीवर आधारित बॉर्डर २ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आली असून २३ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ओपनिंग करताच मोठा गल्ला जमवला आहे. अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. २९ वर्षांनंतर आलेल्या या सिक्वेलबाबत प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच प्रचंड उत्सुकता होती आणि ती पहिल्याच दिवशी दिसून आली. सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने थिएटरमध्ये पोहोचले. देशभक्तीचा जोरदार डोस, युद्धाचे दृश्य आणि भावनिक कथानक यामुळे बॉर्डर २ ने पहिल्याच दिवशी चर्चा निर्माण केली.

अनुराग सिंह दिग्दर्शित बॉर्डर २ सुमारे २७५ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आली आहे. या सिनेमात सनी देओल यांनी सर्वाधिक मानधन घेतल्याचे सांगितले जाते, जे सुमारे ५० कोटी रुपये आहे. चित्रपटाची रिलीज तारीख प्रजासत्ताक दिनाच्या आसपास ठेवल्यामुळे त्याचा मोठा फायदा झाला आहे. सुट्टीचा काळ, देशभक्तीची थीम आणि मोठी स्टारकास्ट यामुळे प्रेक्षकांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. रिलीजपूर्वीच या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमधून १२.५० कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यामुळे पहिल्या दिवसाची ओपनिंग भक्कम असेल, याचा अंदाज आधीच व्यक्त केला जात होता. बॉक्स ऑफिस आकडेवारीनुसार, बॉर्डर २ ने पहिल्याच दिवशी भारतात सुमारे ३० कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामुळे हा सिनेमा रिपब्लिक डेच्या आसपास रिलीज झालेल्या हिंदी चित्रपटांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. १९९७ मध्ये आलेल्या बॉर्डर चित्रपटाने ओपनिंग डे ला फक्त १.१० कोटी रुपयांची कमाई केली होती, त्या तुलनेत हा आकडा खूप मोठा मानला जात आहे. या कमाईमुळे बॉर्डर २ ने अनेक मोठ्या सिनेमांना मागे टाकले असले, तरी काही सुपरहिट चित्रपटांचे रेकॉर्ड तोडता आलेले नाहीत.

Previous Post

बिग बॉसच्या घरात सागर कारंडे तंबाखू मळत असल्याचा दावा

Next Post

मराठी भाषा ही सतत वाहणारी परंपरा – डॉ.सचिव किरण कुलकर्णी

Next Post
मराठी भाषा ही सतत वाहणारी परंपरा – डॉ.सचिव किरण कुलकर्णी

मराठी भाषा ही सतत वाहणारी परंपरा - डॉ.सचिव किरण कुलकर्णी

BreakingNews

अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधत मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर

डिजिटल व्यवस्थेचा ज्येष्ठ नागरिकांना फटका; बोटांचे ठसे न जुळल्याने एसटीच्या सवलतीला मुकण्याची वेळ!

विनातिकीट फिरणाऱ्यांना १६ कोटींचा फटका! मध्य रेल्वेने ४० दिवसांत पकडले २ लाख प्रवासी

मलबार हिल निसर्ग उन्नत मार्ग ऑगस्टअखेरपर्यंत पर्यटकांसाठी बंद!

डॉ. निलेश साबळेची नव्या शोची चाहूल; ‘काहीतरी मॅड येतंय लवकरच’ पोस्टने चाहत्यांमध्ये उत्सुकता

पारशी डेअरीवर FDA ची मोठी पकड! दूध भेसळप्रकरणी परवाना निलंबित, दोघांना बेड्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.