Lokrakshanay
Wednesday, April 8, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मंत्रालयाशेजारील परिसरात इमारतींच्या उंचीवर मर्यादा!

मंत्रालयातून समुद्रकिनाऱ्याचा नजारा दिसणार नसल्याने सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 21, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
मंत्रालयाशेजारील परिसरात इमारतींच्या उंचीवर मर्यादा!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मंत्रालयाच्या पाचव्या आणि सहाव्या मजल्याच्या खिडकीतून दिसणारा दक्षिण मुंबईचा प्रशस्त नजारा पाहताना कोणताही अडथळा येऊ नये, म्हणून मंत्रालयाशेजारी बांधण्यात येत असलेल्या नव्या इमारतीचा पाचवा मजला बारगळण्याची चिन्हे आहेत. या इमारत चार मजल्यांचीच बांधण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू असल्याचे समजते.

मंत्रालयातील जागेच्या अडचणींमुळे मंत्री कार्यालयांना सध्या सोयीची जागा उपलब्ध नाही. याशिवाय जागा कमी पडत असल्याने मंत्र्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने मंत्रालयाच्या मुख्य इमारतीला लागून नवीन इमारत उभारण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला सात मजली इमारत बांधण्याचे नियोजन होते. मात्र, हेरिटेज समितीचा आक्षेप आणि सर्वोच्च न्यायालयाने मंत्रालय परिसरातील इमारतींना घालून दिलेली २४ मीटर उंचीची मर्यादा यामुळे नवी इमारत पाच मजली बांधण्याचा निर्णय झाला. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांची दलाने आहेत. याशिवाय सचिवांचीही कार्यालये आहेत. येथून समुद्रकिनारा दिसतो. नव्या इमारतीचा पाचवा मजला बांधला की, समुद्रकिनाऱ्याचा ‘नजारा’ मंत्रालयातून दिसणार नाही. त्यामुळे नवी इमारत पाचऐवजी चारच मजल्यांची बांधावी, असे सरकारच्या विचाराधीन आहे. त्या दृष्टीने गंभीर चर्चाही सुरू आहे. मात्र, यावर अंतिम निर्णय झाला नसल्याने तूर्त चार मजल्यांपर्यंत बांधकाम करण्याचे नियोजन केले जात असल्याचेही समजते.

Previous Post

एसटीच्या ऑनलाईन तिकिटांना मिळतोय प्रतिसाद; डिसेंबर महिन्यात मोठी भर

Next Post

कॉपी मुक्त परीक्षा! सर्व परीक्षा वर्गात सीसीटीव्ही बसवण्यात येणार – राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय

Next Post
कॉपी मुक्त परीक्षा! सर्व परीक्षा वर्गात सीसीटीव्ही बसवण्यात येणार – राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय

कॉपी मुक्त परीक्षा! सर्व परीक्षा वर्गात सीसीटीव्ही बसवण्यात येणार – राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय

BreakingNews

खासगी बसवर सरकारचा डिजिटल ‘वॉच’; आता फिटनेसपासून ड्रायव्हरपर्यंत सर्वकाही ट्रॅक होणार!

गरीब महिलांच्या नशिबी पुन्हा धुराचे लोट; सिलिंडर उपलब्ध नसल्याने चुलीचाच आधार

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे १० पदरी होणार

पॅन कार्ड प्रक्रियेत आता आधारसोबत मतदान कार्ड किंवा जन्म दाखला बंधनकारक – आयकर विभागाचा इशारा

ठाणेकरांच्या खिशाला कात्री! मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांनी ओलांडला शंभरीचा टप्पा

राज्यातील प्रत्येक शाळेत मासिक पाळीच्या काळात विश्रांतीसाठी ‘पिंक रूम’! विद्यार्थिनींच्या आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.