Lokrakshanay
Sunday, March 15, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातून ७ महिन्यांच्या बालकाचे अपहरण

लोहमार्ग पोलिसांनी तपास करून अहमदाबादमधून एका महिलेसह दोघांना अटक

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 2, 2024
in ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्र
पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातून ७ महिन्यांच्या बालकाचे अपहरण
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारातून सात महिन्यांच्या बालकाचे अपहरण करण्यात आले. लोहमार्ग पोलिसांनी तपास करून अहमदाबादमधून एका महिलेसह दोघांना अटक केली. अपहृत बालकाला पालकांच्या ताब्यात देण्यात आले. मोहम्मद खान कुरेशी (वय २७), नजमा अक्रम खान कुरेशी (वय २५) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत बालकाची आई पूजा संतोष दास (वय २८, रा. झारखंड) यांनी लोहमार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पुणे रेल्वे स्थानकातून १७ सप्टेंबर रोजी पूजा दास नातेवाईकांसोबत झारखंडला निघाल्या होत्या. त्यांच्याबरोबर सात महिन्यांचा मुलगा होता. रेल्वे स्थानकाच्या आवारात आरोपी मोहम्मद आणि नजमा यांनी पूजाशी ओळख केली. त्यांना बोलण्यात गुंतविले. पूजा यांच्या ताब्यातून बालकाला नजमाने घेतले. त्यांचे लक्ष नसल्याची संधी साधून मोहम्मद आणि नजमा पसार झाले.

गणेश विसर्जनाच्या रेल्वे स्थानकाच्या आवारातून बालकाचे अपहरण करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली होती. लोहमार्ग पोलिसांनी तातडीने तपास सुरु केले. बालकाचा शोध घेण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली. तांत्रिक तपासात पसार झालेले आरोपी अहमदाबादमधील उनावा परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथक अहमदाबादला रवाना झाले. पोलिसांनी नजमा आणि मोहम्मद यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून बालकाची सुखरुप सुटका करण्यात आली.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त अधीक्षक रोहीदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर, इरफान शेख, पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक, उपनिरीक्षक स्वप्नील वाघमारे, सचिन नाझरे, पोलिस कर्मचारी सुनील कदम, अनिल टेके, आनंद कांबळे, निलेश बीडकर, अनिल दांगट, विकास केंद्रे, जयश्री ढाकरे यांनी ही कारवाई केली.

Previous Post

मद्रास उच्च न्यायालयाने जग्गी वासुदेव म्हणजेच सद्गुरूंना फटकारले

Next Post

मानसी नाईकचं ‘नाकात नथ’ हे नवं गाणं येतंय प्रेक्षकांच्या भेटीला

Next Post
मानसी नाईकचं ‘नाकात नथ’ हे नवं गाणं येतंय प्रेक्षकांच्या भेटीला

मानसी नाईकचं ‘नाकात नथ’ हे नवं गाणं येतंय प्रेक्षकांच्या भेटीला

BreakingNews

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! विशेष मोहिमेअंतर्गत १७२ एलपीजी सिलिंडर जप्त

दिसायला पिवळं, चवीला गोड! वसई-विरारच्या बाजारपेठेत नवीन फळाची एन्ट्री

मराठी नाही तर मान्यता नाही! शिक्षणमंत्र्यांचा शाळांना कठोर कारवाईचा इशारा

गॅस सिलिंडरची लूट थांबणार! तक्रारीसाठी ठाणे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी

संविधानिक मूल्यांचे रक्षण करणे ही काळाची गरज – डॉ. राम पुनियानी

युद्धभूमीतून प्रवास यशस्वी! होर्मुझ सामुद्रधुनी पार करून पहिले तेलवाहू जहाज मुंबईत दाखल

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.