Lokrakshanay
Thursday, January 15, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home Uncategorized

केडियांनी मागितली राज ठाकरेंची माफी; “मी केलेलं ते ट्विट..”

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 5, 2025
in Uncategorized, ताज्या बातम्या, मुंबई
केडियांनी मागितली राज ठाकरेंची माफी; “मी केलेलं ते ट्विट..”
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबईतील व्यावसायिक सुशील केडिया यांनी सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आव्हान देण्यात आलं होतं. तसेच काही वृत्तवाहिन्यांना प्रतिक्रिया देत मराठी येत नसल्याचं सांगत आपण मराठी शिकणार नसल्याच्या संदर्भात केडिया यांनी विधान केलं होतं. एवढंच नाही तर राज ठाकरे व एक दहशतवादी यांच्या धोरणात काय फरक आहे? असा थेट सवाल सुशील केडिया यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे सुशील केडिया यांच्या विरोधात मनसेच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर सुशील केडिया यांचं कार्यालय मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी फोडल्याची माहिती देखील समोर आली होती. मात्र, यानंतर अखेर सुशील केडिया यांनी माफी मागितली आहे. ‘मी माझ्या चुकीबद्दल माफी मागतो’, असं म्हणत केडिया यांनी एक्सवर व्हिडीओ पोस्ट करत माफी मागितली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ‘राज ठाकरे यांच्याबद्दल मला नेहमीच आदर, कृतज्ञता वाटत आली आहे. मी माझी चूक मी स्विकारतो. तसेच मी आता अपेक्षा करतो की वातावरण शांत करावं, मी त्यांचा आभारी आहे’, असं केडिया यांनी म्हटलं आहे.

सुशील केडिया यांनी असंही म्हटलं की, “मी केलेलं ते ट्विट चुकीच्या मानसिक अवस्थेत व तणावात लिहिलं गेलं होतं. पण माझ्या त्या ट्विटचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. काही लोकांना वाद निर्माण करत त्यामधून फायदा मिळवण्याचा होता. पण मराठी न कळणाऱ्या काही जणांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर मी मानसिक तणावाखाली होतो. पण मला आता जाणवत आहे की मी माझी प्रतिक्रिया मागे घ्यायला हवी”, असं सुशील केडिया म्हणाले आहेत. सुशील केडिया यांनी एक पोस्ट शेअर केली होती आणि त्या पोस्टमध्ये राज ठाकरेंच्या मराठी भाषेच्या आग्रहावर टीका केली होती. मराठी शिकणार नाहीच, अशी भूमिका सुशील केडिया यांनी मांडली होती. “राज ठाकरे, याची नोंद घ्या की, मी मुंबईत गेल्या ३० वर्षांपासून राहतो. पण मला मराठी व्यवस्थित येत नाही. आता तुमचे यासंदर्भातले बेफाम गैरवर्तन पाहता मी हा पणच केला आहे की, जोपर्यंत तुमच्यासारखे लोक मराठी माणसाचे कैवारी म्हणून वावरत आहेत, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही, काय करायचंय बोला”, असं केडियांनी म्हटलं होतं.

Previous Post

“ ‘तो’ डिलीव्हरी बॉय नव्हे तर तिचा मित्रच..”; तरुणीचा मास्टरप्लान उघड

Next Post

NSG कमांडोचा राज ठाकरे यांना सवाल,“मुंबईवर २६/११ हल्ला झाला मी उत्तर प्रदेशचा असूनही महाराष्ट्रासाठी माझं रक्त सांडलं तेव्हा तुमचे योद्धे कुठे होते?”

Next Post
NSG कमांडोचा राज ठाकरे यांना सवाल,“मुंबईवर २६/११  हल्ला झाला मी उत्तर प्रदेशचा असूनही महाराष्ट्रासाठी माझं रक्त सांडलं तेव्हा तुमचे योद्धे कुठे होते?”

NSG कमांडोचा राज ठाकरे यांना सवाल,“मुंबईवर २६/११ हल्ला झाला मी उत्तर प्रदेशचा असूनही महाराष्ट्रासाठी माझं रक्त सांडलं तेव्हा तुमचे योद्धे कुठे होते?”

BreakingNews

राज्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर राहणार ड्रोन कॅमेऱ्याची नजर!

उल्हासनगरमध्ये खळबळ : ५० लाखांची रोकड जप्त!

मताधिकार मोबाईल ॲप : मतदारांना घरबसल्या शोधता येणार यादीतील नाव आणि मतदान केंद्र!

आता एका सिगारेटसाठी मोजावे लागणार ७२ रुपये?

कल्याण हादरले! २१ वर्षीय एअर होस्टेस तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

अमेरिकेला भारतीय कोळंबीची चटक! शुल्कात वाढ केल्यानंतरही निर्यातीत वाढ

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.