Lokrakshanay
Wednesday, October 28, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

३ लाखांच्या ‘iPhone Duo’च्या इनर डिस्प्लेमध्ये बिघाड; प्रभावित ग्राहकांना मोफत नवीन फोन देण्याची ॲपलची घोषणा!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 28, 2026
in ताज्या बातम्या, मनोरंजन
३ लाखांच्या ‘iPhone Duo’च्या इनर डिस्प्लेमध्ये बिघाड; प्रभावित ग्राहकांना मोफत नवीन फोन देण्याची ॲपलची घोषणा!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : ॲपलच्या पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोन ‘आयफोन डुओ’ संदर्भात स्क्रीनच्या समस्यांबाबत वाढत्या तक्रारी समोर येत असून, कंपनीने अखेर काही डिव्हाइसमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याचे मान्य केले आहे. लाँचपूर्वीच मोठी उत्सुकता निर्माण झालेल्या या फोल्डेबल आयफोनला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र, वापरादरम्यान अनेक ग्राहकांनी इनर डिस्प्लेवर तडे जाणे, स्क्रीनमध्ये बिघाड होणे आणि फोन उघडल्यानंतर काही वेळातच समस्या निर्माण होण्याच्या तक्रारी केल्या. या घटनांचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर कंपनीने याची दखल घेतली आहे. विशेषतः स्क्रीन ज्या भागातून दुमडते, त्या सेंट्रल हिंज परिसरात ही समस्या अधिक प्रमाणात दिसून येत असल्याचे अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे. हा भाग वारंवार उघडणे-बंद करण्याच्या प्रक्रियेत सर्वाधिक वापरला जात असल्याने त्याठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याचे सांगितले जात आहे.

या पार्श्वभूमीवर प्रभावित ग्राहकांना दिलासा देत ॲपलने दोषग्रस्त डिव्हाइस बदलून नवीन डिव्हाइस देण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या माहितीनुसार, ही समस्या सर्वच आयफोन डुओ मॉडेलमध्ये नसून काही निवडक युनिट्समध्ये आढळली आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांच्या फोनच्या इनर स्क्रीनवर तडे दिसत आहेत किंवा डिस्प्लेसंदर्भात इतर अडचणी निर्माण होत आहेत, त्यांनी तातडीने ॲपल केअरशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तपासणीनंतर पात्र ठरणाऱ्या ग्राहकांना रिप्लेसमेंटची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून, त्यासाठीचे अंतिम निकष ॲपल केअरमार्फत निश्चित केले जातील. कंपनीच्या या निर्णयामुळे प्रभावित ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

इन्स्टाग्रामची युट्यूबला थेट टक्कर! आता पाहता येणार ९० मिनिटांचे व्हिडिओ आणि पॉडकास्ट

Next Post

आता घरबसल्या करता येणार दारूचे ऑनलाईन बुकिंग, सरकारची मोठी घोषणा!

Next Post
आता घरबसल्या करता येणार दारूचे ऑनलाईन बुकिंग, सरकारची मोठी घोषणा!

आता घरबसल्या करता येणार दारूचे ऑनलाईन बुकिंग, सरकारची मोठी घोषणा!

BreakingNews

‘बिग बॉस २०’चा ग्रँड फिनाले डिसेंबरमध्ये? रोहित शेट्टीच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

केडीएमसी कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट; ₹२१ हजार बोनस, आशा सेविकांनाही वाढीव लाभ

आता घरबसल्या करता येणार दारूचे ऑनलाईन बुकिंग, सरकारची मोठी घोषणा!

३ लाखांच्या ‘iPhone Duo’च्या इनर डिस्प्लेमध्ये बिघाड; प्रभावित ग्राहकांना मोफत नवीन फोन देण्याची ॲपलची घोषणा!

इन्स्टाग्रामची युट्यूबला थेट टक्कर! आता पाहता येणार ९० मिनिटांचे व्हिडिओ आणि पॉडकास्ट

शेतकऱ्यांना तातडीची मदत ते ई-वाहनांचा विकास! जाणून घ्या मंत्रिमंडळ बैठकीतील १२ मोठे निर्णय

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.