Lokrakshanay
Wednesday, April 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

“बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करा, नाहीतर..”, खासदार हरिभाऊ राठोड यांचा इशारा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 4, 2025
in ठाणे, ताज्या बातम्या
“बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करा, नाहीतर..”, खासदार हरिभाऊ राठोड यांचा इशारा
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाज हा अनुसूचित जमातीचा घटक असूनही महाराष्ट्र सरकार त्यांच्यावर अन्याय करत असल्याचा आरोप माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी ठाण्यातील मोर्चात केला. बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करा, नाहीतर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. आजचा मोर्चा हा सेमीफायनल आहे, आणि १७ ऑक्टोबरला मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात आरक्षणाचा फायनल एल्गार होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या आधारे ओबीसी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्याच गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा ‘आदिम जमात’ असा स्पष्ट उल्लेख असून, त्यांना अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याची मागणी या समाजाकडून होत आहे. या मागणीसाठी राज्यभर बंजारा समाज मोर्चे काढत आहे. त्याच मोहिमेचा भाग म्हणून ठाण्यातील कापूरबावडी ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. “आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे”, “जय सेवालाल”, “एक गोर सव्वा लाखेर जोर” अशा घोषणा देत शेकडो बंजारा बांधव, महिला आणि लहान मुले पारंपारिक वेशभूषेत सहभागी झाले होते. या मोर्चात बंजारा नेते शंकर पवार, नंदू पवार, कविराज चव्हाण, सुभाष राठोड, छाया राठोड, राकेश जाधव, सुधीर राठोड, अनिल राठोड, कैलास राठोड यांच्यासह हजारो बांधव सहभागी झाले होते. हैदराबाद गॅझेट हे नोंदीचं नव्हे तर पुराव्याचं दस्तऐवज आहे. मराठवाड्यातील मराठा समाजाला जसा ‘कुणबी’ म्हणून दर्जा मिळाला, तसाच आमचा बंजारा समाज कर्नाटक, आंध्रप्रदेशमध्ये अनुसूचित जमातीत समाविष्ट आहे. आमच्याकडे संविधानातील लिस्ट, मंडल आयोगाचा उल्लेख आणि ऐतिहासिक पुरावे आहेत. शासनाने तातडीने जीआर काढून आम्हाला एसटीचा दर्जा द्यावा,” असे माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी मोर्चाला संबोधित करताना सांगितले.

Previous Post

मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा; ज्येष्ठ अभिनेत्री ‘संध्या शांताराम’ यांचे निधन

Next Post

राज्यातील ६वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘विकसित भारत बिल्डथॉन २०२५’ उपक्रमाचा शुभारंभ

Next Post
राज्यातील ६वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘विकसित भारत बिल्डथॉन २०२५’ उपक्रमाचा शुभारंभ

राज्यातील ६वी ते १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘विकसित भारत बिल्डथॉन २०२५’ उपक्रमाचा शुभारंभ

BreakingNews

प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने ठाणे, मिरा-भाईंदरचा कायापालट; लवकरच उभे राहणार ५ स्टार हॉटेल

आता माकड पकडा आणि ६०० रुपये मिळवा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.