Lokrakshanay
Saturday, July 11, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

‘ठरलं तर मग’: पूर्णा आजी येणार परत!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 18, 2025
in ताज्या बातम्या, मनोरंजन
‘ठरलं तर मग’:  पूर्णा आजी येणार परत!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : ‘ठरलं तर मग’ मालिका गेली तीन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेतल्या प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. काही दिवसांपूर्वीच पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांचं निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. ठरलं तर मगच्या टीमलाही ज्योती ताई आपल्यातून निघून गेल्याचं दु:ख पचवणं आजही अवघड जातंय. पण शो मस्ट गो ऑन….गेले कित्येक दिवस पूर्णा आजी या पात्राला प्रेक्षक मिस करत होते. प्रेक्षकांच्या इच्छेखातर पूर्णा आजी पुन्हा आपल्या भेटीला येणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी पूर्णा आजीची भूमिका साकारणार आहेत.

पूर्णा आजी म्हणजेच रोहिणी ताई म्हणाल्या, ‘ठरलं तर मग’ मालिका माझी आवडती मालिका आहे आणि मी न चुकता पहाते. याच मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणार आहे. मनात संमिश्र भावना आहेत. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कुणीतरी साकारलेली भूमिका पुढे नेणार आहे. पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांच्यासोबत माझी जुनी मैत्री होती. कधी वाटलं नव्हतं ती अशी अचानक सोडून जाईल आणि तिची भूमिका मी साकारेन. कलाकाराने ती भूमिका एका पातळीवर नेऊन ठेवलेली असते. त्या कलाकाराने केलेलं काम पुढे न्यायचं थोडं जबाबदारीचं काम आहे. माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करणार आहे. प्रेक्षकांनी तितक्याच दिलदारपणे स्वीकारावं ही इच्छा आहे.’ पूर्णा आजीच्या एण्ट्रीने सेटवरही आनंदाचं वातावरण आहे. सगळ्या टीमने मिळून रोहिणी ताईंचं मनापासून स्वागत केलं आहे. या मालिकेचा आता नवा प्रोमोही आला आहे. यामुळे प्रेक्षकांना आनंद झालाय.

 

Previous Post

भयानक अपघात: समुद्रात उलटली बोट, ३ भारतीयांचा मृत्यू

Next Post

कर्जतमध्ये शरद पवार गटाची “काळी दिवाळी”

Next Post
कर्जतमध्ये शरद पवार गटाची “काळी दिवाळी”

कर्जतमध्ये शरद पवार गटाची “काळी दिवाळी”

BreakingNews

हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर; ७ डिसेंबरपासून नागपुरात रंगणार राजकीय रणसंग्राम!

‘शाळा बंद’ आंदोलन महागात; राज्यातील ८,६०० शिक्षकांचे वेतन कापणार!

तामिळनाडूत प्लास्टिक रिसायकलिंगला चालना; रिकामी प्लास्टिक बाटली दिल्यास मिळणार ५ रुपयांचा कॅशबॅक!

नवी मुंबई विमानतळ नामांतरण आंदोलन भोवले; २०० ते ३०० आंदोलकांवर पनवेल पोलिसांत गुन्हा!

‘सैराट २’ येणार का? नागराज मंजुळे यांची सिक्वेलबाबत स्पष्ट भूमिका

२० रुपयांच्या चोरीच्या आरोपामुळे ८वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; कुटुंबाचा शिक्षकांवर गंभीर आरोप!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.