Lokrakshanay
Monday, March 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

निवडणूक लढवण्यासाठी आयपीएस अधिकारी रहमान यांची स्वेच्छानिवृत्तीची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली

लोकसभा निवडणुकीत धुळे येथून वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केलेले आयपीएस अधिकारी अब्दुर रहमान यांनी स्वेच्छानिवृत्तीच्या मागणीसाठी केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 24, 2024
in ताज्या बातम्या, मुंबई
निवडणूक लढवण्यासाठी आयपीएस अधिकारी रहमान यांची स्वेच्छानिवृत्तीची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : लोकसभा निवडणुकीत धुळे येथून वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केलेले आयपीएस अधिकारी अब्दुर रहमान यांनी स्वेच्छानिवृत्तीच्या मागणीसाठी केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. रहमान यांची स्वेच्छानिवृत्तीची मागणी फेटाळण्याच्या केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाने (कॅट) दिलेल्या निर्णयात हस्तक्षेपाची गरज भासत नाही, असेही न्यायालयाने त्यांना दिलासा नाकारताना स्पष्ट केले. स्वेच्छानिवृत्ती मंजूर करण्यासाठी कोणतीही अडचण नाही. त्यानंतरही केंद्र सरकारकडून स्वेच्छानिवृत्तीची मागणी मान्य केली जात नाही, असा दावा रहमान यांनी याचिकेद्वारे केला होता. मात्र, या याचिकेवर बरेच दिवस सुनावणी सुरू राहिल्याने रहमान यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जही दाखल करता आला नव्हता. दीर्घ सुनावणीनंतर त्यांच्या याचिकेवरील निर्णय मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने राखून ठेवला होता. खंडपीठाने या प्रकरणी निकाल देताना रहमान यांची याचिका फेटाळली.

रहमान यांच्याविरोधात २००२ ते २०२२ या कालावधीत तीन तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्यात, पहिली तक्रार ही दुसरे लग्न करून रहमान यांनी सेवा नियमांचे उल्लंघन केल्याश, तर दुसरी तक्रार ही पहिली पत्नी व मुलांचा मानसिक, शारीरिक छळ केल्याच्या आरोपाशी संबंधित होती. तिसरी तक्रार ही सेवेत असतानाही समान नागरी कायद्याविरोधी आंदोलनात सहभागी झाल्याबाबत होती. या तक्रारी त्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज करण्यापूर्वीच्या असल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच, या प्रकरणी न्यायालयाचा हस्तक्षेप गरजेचा नसल्याचे स्पष्ट करून रहमान यांची याचिका फेटाळली.

Previous Post

ठाणे पोलीस आयुक्तांकडे संरक्षणाची मागणी; डोंबिवलीतील बेकायदा राधाईच्या जमीन मालकांच्या जिवाला गुंडांपासून धोका

Next Post

पालिका प्रशासनाने निविदा काढूनही त्यास ठेकेदारांचा प्रतिसाद नाही; निविदेतील अटी व शर्तींमध्ये बदल करत नव्याने काढल्या निविदा

Next Post
पालिका प्रशासनाने निविदा काढूनही त्यास ठेकेदारांचा प्रतिसाद नाही; निविदेतील अटी व शर्तींमध्ये बदल करत नव्याने काढल्या निविदा

पालिका प्रशासनाने निविदा काढूनही त्यास ठेकेदारांचा प्रतिसाद नाही; निविदेतील अटी व शर्तींमध्ये बदल करत नव्याने काढल्या निविदा

BreakingNews

माहिती अधिकाराचा गैरवापर करत गौरव स्वीट्सला लुटण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून दोघांना बेड्या

बुलाती है मगर जाने का नहीं… ‘टिंडर’चा भयानक कांड

वरळीत गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड! विशेष मोहिमेअंतर्गत १७२ एलपीजी सिलिंडर जप्त

दिसायला पिवळं, चवीला गोड! वसई-विरारच्या बाजारपेठेत नवीन फळाची एन्ट्री

मराठी नाही तर मान्यता नाही! शिक्षणमंत्र्यांचा शाळांना कठोर कारवाईचा इशारा

गॅस सिलिंडरची लूट थांबणार! तक्रारीसाठी ठाणे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबर जारी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.