नवी मुंबई : नवी मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाला जोडणाऱ्या मेट्रोचं काम लवकरच सुरु होणार आहे. नवी मुंबई आणि मुंबईला जोडणाऱ्या या मेट्रो ८ मार्गिकेचं काम लवकरच सुरु होणार आहे. सिडकोने राज्य शासनाला या मेट्रोचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यात आले आहे. हे मेट्रो नेरूळ आणि सीवूड्स रेल्वे स्थानकांना जोडली जाणार आहे.
मेट्रो ८ मार्गिकेचे काम एमएमआरडीए (MMRDA)आणि सिडको (CIDCO) संयुक्तपणे करणार होते. मात्र, आता या मार्गिकेची उभारणी सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर केली जाणार आहे. आता निविदा राबवण्याची जबाबदारी सिडकोवर सोपवण्यात आली आहे. यामुळे या मार्गिकेचा आराखडा सिडकोने तयार केला आहे. हा आराखडा आता मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला आहे. आता ऑक्टोबरमध्ये याला मंजुरी मिळू शकते. मेट्रो ८ चा मार्ग मुंबई विमानतळ ते नवी मुंबई एअरपोर्टला जोडला जाणार आहे. या मार्गात एकूण २० स्थानके असणार आहेत.हे मेट्रो लोकमान्य टर्मिनस येथे रेल्वे मार्गाशी जोडली जाणार आहे.यामुळे एअरपोर्ट, रेल्वे आणि मेट्रो असे तिन्ही मार्ग जोडले जाणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण २० हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यामधील चार स्टेशन हे भूमिगत असणार आहेत. या मेट्रोचं काम लवकरच सुरु होणार आहे.
मेट्रो ८ मार्गिकेतील स्थानके
- मुंबई विमानतळ टर्मिनल २
- फिनिक्स मॉल
- एसजी बर्वे मार्ग
- कुर्ला
- लोकमान्य टिळक टर्मिनस
- गरोडिया नगर
- बैगनवाडी
- मानखुर्द
- आएसबीटी
- वाशी
- सानपाडा
- जुईनगर
- एलपी
- नेरुळ स्थानक
- सीवूड्स स्टेशन
- अपोलो
- सागर संगम
- तारघर
- नवीन मुंबई एअरपोर्ट वेस्ट
- नवी मुंबई विमानतळ टी २

