Lokrakshanay
Thursday, July 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

‘’उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना ते साधा ‘शक्ती’ कायदा आणू शकले नाहीत’’- नितेश राणे

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 7, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, रत्नागिरी
‘’उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना ते साधा ‘शक्ती’ कायदा आणू शकले नाहीत’’- नितेश राणे
Share on FacebookShare on Whatsapp

कणकवली : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’मुळे महायुती सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांबद्दल राज्यातील जनतेच्या मनात प्रेम, आपुलकी निर्माण झाली आहे. त्यामुळे विरोधी पक्ष असलेल्या महाविकास आघाडीची झोप उडाली आहे. त्यांना ही योजनाच बंद करायची आहे. त्यामुळेच या योजनेसंदर्भात खोटे बोलून ते जनतेची दिशाभूल करत आहेत अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे. कणकवली येथे आज, सोमवारी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

राणे म्हणाले, प्रथम खोटे बोलायचे आणि त्यानंतर न्यायालयासमोर अटक करू नका असे सांगत माफी मागायची, यात संजय राऊत यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. मध्यप्रदेशमध्ये लाडकी बहीण योजना सुरळीत चालू आहे. सर्व भगिनींना चांगल्या प्रकारे दर महिन्याला लाभ मिळतो आहे. असे असताना संजय राऊत ही योजना मध्यप्रदेशमध्ये बंद झाली अशी खोटी माहिती देत असतील तर त्यांनी याबद्दलचा एक तरी पुरावा द्यावा. अन्यथा महाराष्ट्रातील भगिनींची माफी मागावी. असे आव्हान आमदार राणे यांनी दिले.

प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनीही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे कौतुक केले. यातूनच महायुती सरकारचे यश दिसून येते. त्यामुळे संजय राऊत यांच्यासारख्या लोकांनी त्याबाबत विनाकारण बोलू नये. उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना ते साधा ‘शक्ती’ कायदा आणू शकले नाहीत. हे त्यांचे मोठे अपयश आहे.

संजय राऊत हे ठेकेदारांचे दलाल झालेले आहेत. राज्यातील सध्याच्या परिस्थितीवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या घरातील दिवाळी अंधारात जाण्याची वेळ आली आहे. त्यांना मोती साबण घेणे पण जड झाले आहे. त्यामुळे ते लाडकी बहीण योजनेबद्दल गळा काढत फिरत आहेत. असेही राणे म्हणाले.

Previous Post

दापोलीत विधी सेवा महाशिबीर शासकीय सेवा योजनांच्या महामेळाव्यात १७ हजार ५०१ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ

Next Post

मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

Next Post
मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची  भेट

मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

BreakingNews

कोपरी-पाचपाखाडीत मतदार पुनरिक्षण मोहिमेला वेग; जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘Enumeration Form’चे वाटप

मुंबईत नवा सागरी मार्ग उभारणार; वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी १.८७ किमीचा प्रकल्प!

ठाण्यात FDAची मोठी कारवाई; गुजरातमधून आणला जाणारा २ ते ३ टन संशयित भेसळयुक्त मावा जप्त!

विसर्जित पीओपी गणेशमूर्तींपासून ७६० अभ्यास टेबल; नवी मुंबई महापालिकेचा पर्यावरणपूरक उपक्रम!

ज्येष्ठ रंगदिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन; मराठी रंगभूमीतील सुवर्णपर्वाचा अस्त!

१८ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.