Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

छताचे प्लास्टर कोसळल्यामुळे मायलेक जखमी; जीवितहानी नाही

छताचे प्लास्टर पडून जखमी झाल्याची माहिती कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉ योगेश यांनी ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 24, 2024
in ठाणे, ताज्या बातम्या
छताचे प्लास्टर कोसळल्यामुळे मायलेक जखमी; जीवितहानी नाही
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : लोकमान्य नगर पाडा क्रमांक ०३ या ठिकाणी असलेल्या तळ अधिक एक मजली तुळजाभवानी निवास या चाळीच्या घरातील तळ मजल्याच्या रूममधील छताचे प्लास्टर कोसळल्याची घटना मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये सुनंदा वारंग (६३) आणि दिनेश (३८) असे मायलेक जखमी झाले आहेत. सुनंदा वारंग यांना उपचारार्थ मुंबईतील सायन रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर दिनेश वारंग याला किरकोळ दुखापत झाल्याने उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

लोकमान्य नगर पाडा क्रमांक ०३ येथील मायलेक छताचे प्लास्टर पडून जखमी झाल्याची माहिती कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉ योगेश यांनी ठामपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. त्यानुसार घटनास्थळी सहाय्यक आयुक्त (लोकमान्य सावरकर प्रभाग समिती), कार्यकारी अभियंता (सार्वजनिक बांधकाम विभाग-लोकमान्य सावरकर प्रभाग समिती), अतिक्रमण विभागाचे कर्मचारी (लोकमान्य सावरकर विभाग समिती) व आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी धाव घेतली. त्या चाळीत तळ आणि पहिल्या मजल्यावर प्रत्येकी तीन- तीन असे सहा रूम आहेत.

यातील रूम नंबर ०१ मधील प्लास्टर पडले असून ती रूम नम्रता वेंगुर्लेकर यांच्या मालकीची आहे. तेथे जखमी वारंग कुटुंब भाड्याने राहत आहेत. तसेच त्या चाळीचे बांधकाम अंदाजे २० ते २५ वर्षे जुने आहे. या घटनेत सुनंदा वारंग यांच्या छातीला, पोटाला तसेच उजव्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना सुरुवातीला कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते, तेथून त्यांना पुढील उपचाराकरिता मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दिनेश यांच्या डाव्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातून उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर घटनास्थळी लोकमान्य-सावरकर प्रभाग समिती यांचे मार्फत पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.

Previous Post

सिडकोने नवी मुंबई विमानतळ परिसरातील रस्ते प्रकल्प सुरू केला; 3,476 कोटी रुपयांच्या निविदा केल्या जाहीर

Next Post

ठाणे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली

Next Post
ठाणे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली

ठाणे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली

BreakingNews

लाडकी बहीण’ आता पडद्यावर! एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘लाडकी बहीण’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

अमेरिकेकडून भारताला ६५७ प्राचीन वस्तू परत; तस्करी जाळ्यावर मोठा आघात

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आता मराठीचे धडे! १ मेपासून ‘व्यवहारिक मराठी’ पुस्तिका हाती, १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

७६ व्या वर्षीही फिटनेसचा जलवा; नाना पाटेकर यांचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल

शेतकऱ्यांनो, सज्ज व्हा! आधारकार्डप्रमाणेच आता डिजिटल आयडी अनिवार्य

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.