Lokrakshanay
Friday, April 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मुंबईच्या महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी संजय घाडींची निवड

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 7, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
मुंबईच्या महापौरपदी भाजपाच्या रितू तावडे तर उपमहापौरपदी संजय घाडींची निवड
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : महापालिका निवडणुकांचा निकाल लागून १५ दिवसांहून अधिक काळ लोटल्यानंतर अखेर महापौर आणि उपमहापौरपदांची नावे जाहीर करण्यात आलीत. भाजपाच्या रितू तावडे या मुंबईच्या नव्या महापौर होणार असून, शिवसेना (शिंदे गट) नेते संजय घाडी यांची उपमहापौरपदी निवड निश्चित झालीय. भाजपा आणि शिवसेनेच्या आज झालेल्या संयुक्त बैठकीत या दोन्ही नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी महापौरपदासाठी रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केली, तर शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी उपमहापौरपदासाठी संजय घाडी यांचे नाव जाहीर केलंय.

घाटकोपरच्या प्रभाग क्रमांक १३२ मधून निवडून आलेल्या रितू तावडे या दुसऱ्यांदा नगरसेविका बनल्या आहेत. गुजरातीबहुल मतदारसंघातून निवडून येऊनही त्या मराठी चेहरा म्हणून ओळखल्या जातात. यापूर्वी त्यांनी शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळलीय. प्रशासकीय अनुभव आणि पक्षातील मजबूत पकड यामुळे त्यांचे नाव महापौरपदासाठी आघाडीवर होते. रितू तावडे यांना महापौरपद देत भाजपाने मराठी अस्मिता आणि गुजराती मतदार या दोन्ही समीकरणांचा विचार केल्याची चर्चा आहे. मराठी महापौर देत विरोधकांच्या अस्मितेच्या राजकारणाला उत्तर देण्यासोबतच गुजराती मतदारांनाही प्रतिनिधित्व मिळाल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यामुळे मुंबईत मराठी-गुजराती सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग भाजपाकडून करण्यात आल्याचे मानले जाते. ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाने सत्तास्थापनेचा दावा केला असून, यंदा सलग दुसऱ्यांदा मुंबईला महिला महापौर मिळणार आहे. महापौरपद भाजपाकडे तर उपमहापौरपद मित्रपक्ष शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या सव्वा वर्षासाठी संजय घाडी यांना उपमहापौरपदाची संधी देण्यात आलीय. दरम्यान, शिवसेनेच्या (ठाकरे गट) माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी वॉर्ड क्रमांक १९९ मधून विजय मिळवत पुन्हा ताकद दाखवली असून, त्यांची महापालिकेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्या नव्या सभागृहात आक्रमक विरोधी पक्षनेत्या म्हणून भूमिका बजावण्याची शक्यता आहे.

Previous Post

आता रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना चाप! पश्चिम रेल्वेकडून संरक्षण जाळ्यांना ग्रीस लावण्यास सुरुवात

Next Post

आता अंतराळवीरांना चंद्रावर आयफोन आणि इतर स्मार्टफोन घेऊन जाण्याची परवानगी

Next Post
आता अंतराळवीरांना चंद्रावर आयफोन आणि इतर स्मार्टफोन घेऊन जाण्याची परवानगी

आता अंतराळवीरांना चंद्रावर आयफोन आणि इतर स्मार्टफोन घेऊन जाण्याची परवानगी

BreakingNews

पालकांची लूट थांबणार! शाळांच्या गणवेश आणि शैक्षणिक साहित्य सक्तीला चाप

रेशनकार्डधारकांना मोठा दिलासा! तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी वाटप

पाकिस्तानात ‘धुरंधर’ रिटर्न्स? लाहोरमध्ये हमजावर भररस्त्यात गोळीबार

चहापूर्वी पाणी फायदेशीर, पण चहानंतर लगेच पाणी टाळा; आरोग्यासाठी महत्त्वाच्या सवयी जाणून घ्या

CBSE निकालात पुणे विभागाची दमदार कामगिरी; देशात ७वे स्थान

धारावी पुनर्विकासाला वेग; सेक्टर ६ मधील झोपड्या रिकाम्या करण्याचे आवाहन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.