Lokrakshanay
Thursday, October 16, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

रेल्वेरुळ ओलांडणं नर्सला जीवावर बेतलं

आसनगाव रेल्वेस्थानकात गंभीर अपघात

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 25, 2023
in ठाणे, ताज्या बातम्या
रेल्वेरुळ ओलांडणं नर्सला जीवावर बेतलं
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : आसनगाव रेल्वे स्थानकावरील मालगाडी खाली आल्याने महिला प्रवाशी गंभीर जखमी झाली आहे. मालगाडी महिलेच्या अंगावरून गेल्याने महिलेचे हात-पाय धडावेगळे झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी महिलेला तातडीने सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विद्या वाखारीकर ( वय ५३, रा. आसनगाव ) असे अपघातात हात- पाय गमावून बसलेल्या महिलेचे नाव आहे. त्या रुग्णालयात नर्सचे काम करतात.

मिळालेल्या माहितीनुसार विद्या वाखारीकर या शहापूर तालुक्यातील आसनगाव येथे कुटूंबासह राहतात. त्या मुंबईतील सायन भागात असलेल्या लोकमान्य टिळक रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत आहेत. त्या नोकरी निमित्त आसनगाव ते सायन रेल्वेस्थानकापर्यत लोकलने प्रवास करतात. नेहमी प्रमाणे शनिवारीही रुग्णालयात सकाळची ड्युटी असल्याने त्या कसाऱ्याहून आसनगाव रेल्वे स्थानकात पहाटे ४ वाजून २८ मिनिटांनी येणाऱ्या कसारा लोकलने मुंबईला जात होत्या.

आसनगाव रेल्वे स्थानकाच्या फलाटावर जाण्यासाठी पूर्वेला पादचारी पूल आहे. स्टेशनवर जाण्यासाठी वळसा न घेता, रुळावर उभ्या असलेल्या मालगाडी खालून पटकन फलाटावर उतरता यावे म्हणून वाखरीकर मालगाडी खाली घुसल्या. त्याच वेळी मालगाडी सुरू झाली. मालगाडी त्यांच्या डाव्या हातावरुन तसेच डाव्यापायावरुन गेल्याने हात तसेच पाय धडावेगळे झाले. हे पाहून मुलाने इतर प्रवाशांच्या मदतीने आरडाओरडा केली. गंभीर जखमी झालेल्या वाखरीकर यांना तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात, नंतर सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. शिवाय, त्या उपचारांना प्रतिसाद देत आहेत, असे कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेच्या वरिष्ठ सल्लागार अनिता झोपे यांनी सांगितले.

Previous Post

कार्यशाळेआधी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला

Next Post

ठाण्यात पावसाचा कहर; २४ तासात तिघांचा जीव गेला

Next Post
ठाण्यात पावसाचा कहर; २४ तासात तिघांचा जीव गेला

ठाण्यात पावसाचा कहर; २४ तासात तिघांचा जीव गेला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

BreakingNews

‘महाभारत’मध्ये कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचे निधन

सिग्नलवर गजरे, वस्तू विकणाऱ्या मुलांसाठी ठाण्यात पहिली सिग्नल शाळा!

शेतकऱ्यांनी आंबा, काजू व केळी या फळपिकांचा विमा उतरवावा – विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले

पुणेकरांची दिवाळी धूमधडाक्यात! २४ तास खुली राहणार फटाक्यांची दुकानं

चित्रपटसृष्टीत शोककळा; प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता राजू तालिकोटे यांचे निधन

फुकट्या रेल्वेप्रवाशांच्या संख्येत वाढ, कारवाईसाठी भरारी पथके स्थापन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.