Lokrakshanay
Thursday, October 16, 2025
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

महिलेची जमीन बळकावून २५ लाखांची खंडणी प्रकरणी गुंड टिपू पठाणसह साथीदारांविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 13, 2025
in गुन्हेगारी, पुणे
महिलेची जमीन बळकावून २५ लाखांची खंडणी प्रकरणी गुंड टिपू पठाणसह साथीदारांविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : हडपसर परिसरातील सय्यदनगर भागात दहशत माजविणारा गुंड टिपू पठाण अणि साथीदारांनी एका महिलेची जमीन बळकावून बेकायदा ताबा घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पठाण आणि साथीदारांनी जमिनीवरील ताबा सोडण्यासाठी महिलेकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितली असून, या प्रकरणी पठाणसह साथीदारांविरुद्ध काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ३१ वर्षीय महिलेने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला मूळची मुंबईतील कुर्ला परिसरातील रहिवासी आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, टिपू उर्फ रिझवान सत्तार पठाण, सादिक कपूर, एजाज पठाण, मेहबूब अब्दुल गफार शेख, जावेद गनी शेख, साजीद जिब्राईल नदाफ, इराफान नासीर शेख, अजीम उर्फ अंट्या महंमद हुसेन शेख, मतीन हकीम सय्यद (सर्व रा. सय्यदनगर, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची सय्यदनगर भागात जमीन आहे. गुंड टिपू पठाण आणि साथीदारांनी महिलेच्या जागेवर बेकायदा पत्र्याची शेड बांधली. या जागेचा ताबा घेऊन एकाला भाड्याने वापरास दिली. पठाण आणि साथीदार त्याच्याकडून दरमहा जागेचे भाडे घेत होते. महिलेने पठाण टोळीला जागेवरचा ताबा सोडण्यास सांगितले. तेव्हा पठाणने महिलेकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी दिल्यानंतर जागेवरचा ताबा सोडतो. पुन्हा या भागात आला तर जीवे मारू, अशी धमकी पठाणने दिल्याचे महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिग पाटील तपास करत आहेत. पठाण याच्यासह साथीदारांची बँक खाती नुकतीच गोठविण्यात आली आहे. काळेपडळ पोलिसांनी पठणसह साथीदारांची घराची झडती घेतली. तेथून जमीन व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे, महागडी मोटार, तीन दुचाकी, तसेच गृहोपयोगी वस्तू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पठाणने केलेल्या बेकायदा बांधकामावर काळेपडळ पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने नुकतीच कारवाई केली होती. या कारवाईत पठाण याचे कार्यालय, तसेच बेकायदा बांधकाम पाडून टाकण्यात आले हाेते. या कारवाईनंतर पोलिसांनी पठाण याच्यासह दहा साथीदारांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. त्यांच्या घरातून पंखे, दूरचित्रवाणी संच, धुलाई यंत्र, महागडे फर्निचर असा चार ते पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हडपसरमधील सय्यदनगर परिसरात पठाण याची दहशत आहे. त्याच्याविरुद्ध वानवडी, हडपसर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. पठाणने यापूर्वी एका महिलेला धमकावून तिच्या जमिनीचा बेकायदा ताबा घेतला होता. महिलेने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली होती. पठाणने एका कार्यक्रमात नोटाही उधळल्या होत्या. पठाण याच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पठाण याच्यासह १६ साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पठाणसह साथीदारांना अटक करून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली. दरम्यान, पठाण टाेळीतील पसार साथीदार शाहरूक उर्फ हट्टी याचा मोहोळ तालुक्यातील लांबोटी गावात पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला होता.

Previous Post

भारताने विकसित केले गुगल मॅप ला टक्कर देणारे ‘Mappls’ App

Next Post

कबुतराचा जीव वाचवताना २८ वर्षीय अग्निशामक दलाच्या जवानाचा मृत्यू

Next Post
कबुतराचा जीव वाचवताना २८ वर्षीय अग्निशामक दलाच्या जवानाचा मृत्यू

कबुतराचा जीव वाचवताना २८ वर्षीय अग्निशामक दलाच्या जवानाचा मृत्यू

BreakingNews

‘महाभारत’मध्ये कर्णाची भूमिका साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचे निधन

सिग्नलवर गजरे, वस्तू विकणाऱ्या मुलांसाठी ठाण्यात पहिली सिग्नल शाळा!

शेतकऱ्यांनी आंबा, काजू व केळी या फळपिकांचा विमा उतरवावा – विभागीय कृषी सहसंचालक शिवाजी आमले

पुणेकरांची दिवाळी धूमधडाक्यात! २४ तास खुली राहणार फटाक्यांची दुकानं

चित्रपटसृष्टीत शोककळा; प्रसिद्ध कॉमेडी अभिनेता राजू तालिकोटे यांचे निधन

फुकट्या रेल्वेप्रवाशांच्या संख्येत वाढ, कारवाईसाठी भरारी पथके स्थापन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.