Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

मुंब्रा घटना : जीव वाचवण्यासाठी जाणला जाणारा प्राणी ठरला एका मुलीच्या मृत्यूस कारणीभूत

अमृतनगर येथील दर्गा रोड परिसरातून सनाबानो शेख (५) ही तिच्या आईसोबत एका इमारतीखालून पायी जात होती. त्याचवेळी इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून एक श्वान थेट सनाबानो हिच्या अंगावर पडले.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 9, 2024
in गुन्हेगारी, ठाणे, ताज्या बातम्या
मद्यधुंद चालकाने वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करून केली मारहाण
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : मुंब्रा येथील अमृतनगर भागात पाचव्या मजल्यावरून पाळीव श्वान इमारती खालून जाणाऱ्या मुलीच्या अंगावर पडल्याने मुलीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुलीच्या आईने मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर जहर सय्यद (२४) याला मुंब्रा पोलिसांनी अटक केली आहे. श्वान पाचव्या मजल्यावरून नेमके कसे पडले याचा तपास पोलीस करत आहेत. अमृतनगर येथील दर्गा रोड परिसरातून सनाबानो शेख (५) ही तिच्या आईसोबत एका इमारतीखालून पायी जात होती. त्याचवेळी इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून एक श्वान थेट सनाबानो हिच्या अंगावर पडले. या घटनेत तिच्या डोक्याला मार लागल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु तिचा मृत्यू झाला.

या विचित्र घटनेनंतर संपूर्ण शहरात खळबळ उडाली. या घटनेचे चित्रीकरण देखील समाजमाध्यमावर प्रसारित झाले होते. अखेर मुलीच्या आईने याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी श्वान मालक जहर सय्यद याला अटक केली आहे. तर या घटनेत पाळवी श्वानाला देखील गंभीर दुखापत झाली आहे. श्वान मालकाने त्याच्या इमारतीच्या गच्चीवर काही श्वान पाळले आहेत. त्याच्याकडे श्वानांचा परवाना आहे का, तसेच हे श्वान कसे पडले, याचा तपास पोलीस करत आहेत.

Previous Post

पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने घोडबंदर परिसरात टंचाईची समस्या

Next Post

कल्याणमध्ये बेकायदेशीररीत्या बांधलेल्या इमारतीतील घरं विकून १० जणांची फसवणूक

Next Post
कल्याणमध्ये बेकायदेशीररीत्या बांधलेल्या इमारतीतील घरं विकून १० जणांची फसवणूक

कल्याणमध्ये बेकायदेशीररीत्या बांधलेल्या इमारतीतील घरं विकून १० जणांची फसवणूक

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.