Lokrakshanay
Monday, June 15, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home महाराष्ट्र

सुट्टीवर घरी आलेल्या ‘इंडो तिबेट बॉर्डर’वरील पोलीस दलातील जवानाचा अपघाती निधन

गेल्या १७ वर्षांपासून ते देशसेवा करीत होते

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 21, 2024
in महाराष्ट्र
सुट्टीवर घरी आलेल्या ‘इंडो तिबेट बॉर्डर’वरील पोलीस दलातील जवानाचा अपघाती निधन
Share on FacebookShare on Whatsapp

सातारा प्रतिनिधी : सुट्टीवर घरी आलेले ‘इंडो तिबेट बॉर्डर’ पोलीस दलातील जवान विजय श्रीरंग सोनावणे, विरमाडे (वय ३७, ता. वाई) यांचे आनेवाडी टोलनाक्याजवळ अपघाती निधन झाले. गणपती विसर्जन मिरवणुकीनंतर विरमाडे येथून सातारा येथील घरी जात असताना हा अपघात झाला. विजय सोनावणे हे सध्या सुट्टीवर आले होते. साताऱ्यातील तामजाईनगर परिसरात ते आपल्या कुटुंबीयांसोबत वास्तव्यास होते. मंगळवारी ते आपल्या मूळ विरमाडे गावी विसर्जन मिरवणुकीसाठी गेले होते.

मिळालेल्या माहिती नुसार, महामार्गावर आनेवाडी टोलनाक्यावर आले असता अंधारामुळे महामार्गावर उभा असलेला ट्रक त्यांच्या निदर्शनास न आल्याने त्यांची दुचाकी ट्रकला पाठीमागून जोरदार धडकली. या धडकेत बुलटेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच सोनावणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते महामार्गावर बेशुद्ध अवस्थेत पडले होते. अपघातानंतर तात्काळ अपघातस्थळी उपस्थित असलेल्या विरमाडे येथील तरुणांनी त्यांना सातारा येथील यशवंत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, जास्त रक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जवान विजय सोनावणे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन बहिणी असा परिवार आहे. गेल्या १७ वर्षांपासून ते देशसेवा करीत होते. जवानाच्या अपघाती निधनामुळे सातारा शहरात सर्वत्र शोककळा पसरली आहे,

Previous Post

रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रकिनारी ‘स्वच्छता ही सेवा 2024’ अंतर्गत स्वच्छता मोहीम

Next Post

अखेर अरबाजचा पटेलचा बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास संपला

Next Post
अखेर अरबाजचा पटेलचा बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास संपला

अखेर अरबाजचा पटेलचा बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास संपला

BreakingNews

दूधात भेसळ कराल तर गाठ माझ्याशी! तुकाराम मुंढेंचा डेअरी चालकांना सज्जड दम

एलटीटीचे तिकीट काढले तरी ठाण्यातच उतरावे लागणार; ४८ तासांचा महाब्लॉक!

नाशिककरांना कारवाईचा धसका! भेसळविरोधी कारवाईनंतर हॉटेलमधून पनीर गायब?

अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांवर ‘मकोका’ लावणार; तुकाराम मुंढेंचे कडक आदेश!

तुकाराम मुंढेंच्या धसक्याने भेसळखोरांचे धाबे दणाणले; बाजारात खवा आणि पनीर थेट १०० रुपयांनी महागले!

सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्ये भोवली! प्रणित मोरेविरोधात सायबर पोलिसांत गुन्हा

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.