Lokrakshanay
Thursday, April 30, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मुंबई महापालिकेने मरोळ येथे साडेतीन एकर जागेत वनीकरणातून साकारलेले उद्यान

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
September 24, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
मुंबई महापालिकेने मरोळ येथे साडेतीन एकर जागेत वनीकरणातून साकारलेले उद्यान
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई प्रतिनिधी : मुंबई महापालिकेने मरोळ येथे मिठी नदी लगतच्या साडेतीन एकर जागेत शहरी वनीकरणातून उद्यान साकारले असून त्यात देशी प्रजातींची झाडे लावण्यात आली आहेत. १०० प्रजातींच्या १० हजार झाडांमधून फेरफटका करता येईल असा लाकडी साकवही तयार करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात हे हिरवाईने नटलेले उद्यान साकारले असून ते लवकरच सर्वसामान्यांसाठी खुले होणार आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरातील नागरिकांना विरंगुळ्याचे आणखी एक ठिकाण उपलब्ध होणार आहे.
मुंबईत अनेक प्रकल्पासाठी झाडे कापावी लागतात. त्या तुलनेत नवीन झाडे लावण्यासाठी मुंबईत जागाही शिल्लक नाहीत. त्यामुळे मुंबई महापालिकेने एकीकडे शहरी वनीकरण, हरितक्षेत्र वाढवण्यासाठी जपानी पद्धतीची अधिकाधिक मियावाकी वने उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. २०२० मध्ये महापालिकेने वृक्षारोपण करून मियावाकी वनांच्या प्रकल्पाचा शुभारंभ केला होता. कमीत कमी जागेत अधिकाधिक फळझाडे, फुलझाडे अशी मियावाकी झाडे लावण्यात येत आहेत. त्यातच गेल्या वर्षभरापासून मरोळ इंडस्ट्रीयल इस्टेटच्या सातबाग परिसरात पालिकेच्या नियोजन विभागाने साडे तीन एकर जागेत शहरी वने विकसित करण्याचा प्रकल्प हाती घेतला. पालिकेच्या नियोजन विभागाने हे उद्यान साकारले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हे उद्यान साकारण्यात आले आहे.
या जागेवर महापालिकेची १.९० एकर बाग आहे. तर मरोळ सहकारी औद्याोगिक वसाहतीकडून काही एकरचा शेजारचा भूखंड ताब्यात घेण्यात आला आहे. महापालिकेच्य नियोजन विभागाकडून सुरू असलेल्या या प्रकल्पात १०० प्रजातींची एकूण दहा हजार फळ,फुल झाडांसह विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. यामध्ये औषधी वनस्पतींचाही समावेश आहे. तसेच फुलपाखरू गार्डनही विकसित करण्यात आले आहे. या साडे तीन एक जागेत ५०० ते ६०० मीटरचा लाकडी बांधकाम असलेला वॉक वे ही उपलब्ध करण्यात आल्याची माहिती नियोजन विभागाच्या संचालक प्राची जांभेकर यांनी दिली.
आंबा, चिकू, पपई, पेरू, सीताफल, औषधी वनस्पती, बांबू इत्यादी फळ-फुलझाडे यामध्ये लावण्यात आली आहेत. या उद्यानामध्ये येणाऱ्या सांडपाण्याचा नैसर्गिक पद्धतीने वापर करून त्या पाण्याचा वापर हिरवळीसाठी केला जात आहे. कर्दळीच्या झाडांमधून हे पाणी सोडले आहे. कर्दळीच्या झाडांतून हे पाणी स्वच्छ होऊन पुढे वाहत जाते व उद्यानासाठी ते वापरले जाते. त्यामुळे या उद्यानाला पाणी फवारण्यासाठी ट्रॅंकर मागवावा लागत नाही.

Previous Post

दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांचे ‘हे’ कृत्य भारतीय संविधानाचे उल्लंघन – आकाश आनंद

Next Post

मुंबई महानगर क्षेत्रातील दळणवळण, पायाभूत सुविधा, आर्थिक विकास वाढीच्या प्रकल्पांना गती द्या: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
मुंबई महानगर क्षेत्रातील दळणवळण, पायाभूत सुविधा, आर्थिक विकास वाढीच्या प्रकल्पांना गती द्या: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई महानगर क्षेत्रातील दळणवळण, पायाभूत सुविधा, आर्थिक विकास वाढीच्या प्रकल्पांना गती द्या: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

BreakingNews

प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने ठाणे, मिरा-भाईंदरचा कायापालट; लवकरच उभे राहणार ५ स्टार हॉटेल

आता माकड पकडा आणि ६०० रुपये मिळवा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.