Lokrakshanay
Tuesday, January 20, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पनवेल : दुचाकीने जात असताना खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात तरुणीची मृत्यू

पळस्पे ते जेएनपीटी या मार्गावरुन दुचाकीने जात असताना २४ वर्षीय तरुणीला स्वत:चा जिव गमवावा लागला आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 5, 2024
in ताज्या बातम्या, नवी मुंबई
पनवेल : दुचाकीने जात असताना खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात तरुणीची मृत्यू
Share on FacebookShare on Whatsapp

पनवेल : पनवेलमधील रस्त्यात पडलेल्या खड्यांमुळे अनेक अपघातांना दररोज वाहनचालक सामोरे जात आहेत. पळस्पे ते जेएनपीटी या मार्गावरुन दुचाकीने जात असताना २४ वर्षीय तरुणीला स्वत:चा जिव गमवावा लागला आहे. ही तरुणी दुचाकीवरुन तीच्या मित्रासोबत पळस्पे ते जेएनपीटी मार्गावर नांदगाव पुलावरुन जात असताना पुलावर पडलेल्या मोठ्या खड्यामुळे दुचाकीचे चाक आदळल्याने दोघेही दुचाकीवरुन खाली कोसळले. त्याच दरम्यान पाठीमागून येणा-या ट्रेलरच्या चाकाखाली २४ वर्षीय तरुणी ठार झाली. मृत तरुणीचे नाव मानसी रोकडे असे आहे. मुंबई (भायखळा) घोडपदेव येथील म्हाडा वसाहतीमध्ये राहणा-या मानसी त्यांचा मित्र आदेश लाड यांच्यासोबत माथेरान ते मुंबई असा दुचाकीवरुन प्रवास करुन घरी येत असताना हा अपघात झाला. पळस्पे ते जेएनपीटी मार्ग हा कॉंक्रीटचा बांधला असला तरी त्यावरही ठिकठिकाणी खड्डे आहेत.

नांदगाव पुलालगत मोठा खड्यात आदेश चालवित असलेल्या दुचाकीचे चाक आदळल्याने दोघेही रस्त्याच्या उजव्या बाजूला उडवले गेले. या दरम्यान आदेशच्या दुचाकीमागून भरधाव वेगाने ट्रेलर (क्रमांक एमएच ४३,यु. १६७३) येत होता. याच ट्रेलरच्या चाकाखाली मानसीचे शरीर आले. यात मानसीचा चेहरा, मान, पाठ यावर हे भरधाव ट्रेलरचे चाक गेल्याने ती ठार झाली. वाहनचालक कोणतीही वैद्यकीय मदत न करता तेथून पळून गेला. पनवेल शहर पोलीस ठाण्यात याबाबत ट्रेलरचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र रस्त्यातील खड्डे वेळीच बुजविले असते तर मानसीचे प्राण वाचले असते. हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतो. सरकारी प्राधिकरणा विरोधात कोणतीही कारवाई पनवेल शहर पोलीसांकडून केली नसल्याचे पोलीसांकडून सांगण्यात येते. पोलीस ट्रेलरचालकाचा शोध घेत आहेत.

Previous Post

ठाकुर्ली रेल्वे स्टेशनजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने प्रवासी घाबरले, जीवितहानी नाही

Next Post

गेल्या १० दिवसांपासून मुसळधार पावसामुळे पाणी टंचाई; सोसायटी मधील रहिवासी हैराण

Next Post
गेल्या १० दिवसांपासून मुसळधार पावसामुळे पाणी टंचाई; सोसायटी मधील रहिवासी हैराण

गेल्या १० दिवसांपासून मुसळधार पावसामुळे पाणी टंचाई; सोसायटी मधील रहिवासी हैराण

BreakingNews

ज्येष्ठ संगीतकार इलयाराजा यांना पद्मपाणी पुरस्कार जाहीर

स्मार्टफोन युजर्ससाठी येणार ‘हे’ ९ नवीन इमोजी

पुण्यातील डेक्कन जिमखाना परिसरातील चंदनाच्या झाडांची चोरी

प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’

मुंबई पोलिसांच्या ‘हाऊसिंग टाऊनशिप’ प्रकल्पाला मंजूरी!

प्रजासत्ताक दिनापासून विरार चर्चगेट मार्गावर वाढणार एसी लोकल फेऱ्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.