Lokrakshanay
Friday, October 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home पालघर

जिल्हा प्रशासनाच्या ‘विकलांगता मुक्त’ मोहिमेला मोठे यश; शस्त्रक्रियेनंतर १८ बालकांनी टाकले पहिले पाऊल

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 2, 2026
in पालघर, महाराष्ट्र
जिल्हा प्रशासनाच्या ‘विकलांगता मुक्त’ मोहिमेला मोठे यश; शस्त्रक्रियेनंतर १८ बालकांनी टाकले पहिले पाऊल
Share on FacebookShare on Whatsapp

पालघर : पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या पुढाकाराने जून २०२६ मध्ये सुरू करण्यात आलेल्या ‘विकलांगता मुक्त पालघर’ अभियानाच्या पहिल्या टप्प्याला मोठे यश मिळाले आहे. या अभियानाअंतर्गत अस्थिव्यंग असलेल्या १८ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया आणि आवश्यक वैद्यकीय उपचार करण्यात आले असून ही बालके आता स्वतःच्या पायावर चालू लागली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांवरील मोठा ताण कमी झाला आहे. विष्णू सवरा सामाजिक न्यास, ज्युपिटर रुग्णालय, इन्स्टिट्यूट ऑफ पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक डिसऑर्डर (मुंबई) आणि मुस्कान चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. तरल नागदा आणि डॉ. जगदीप घमेले यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ६ जून रोजी पालघर जिल्हा रुग्णालयात आयोजित विशेष शिबिरात जन्मतः किंवा बालवयात विविध अस्थिविकारांनी ग्रस्त असलेल्या १८२ बालकांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी ६२ बालकांवर शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले असून २७ बालकांना लघु शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे निदान झाले. त्यापैकी १८ बालकांवरील उपचार यशस्वीरीत्या पूर्ण झाले असून उर्वरित बालकांवर तसेच मोठ्या आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांवर आगामी काही महिन्यांत उपचार करण्यात येणार आहेत.

उपचारानंतर बालकांच्या प्रकृतीवर नियमित लक्ष ठेवण्यासाठी आणि पालकांना एकाच ठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आता दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी पालघर ग्रामीण रुग्णालयात विशेष फॉलो-अप शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. नुकत्याच झालेल्या तपासणी शिबिरात शस्त्रक्रिया झालेली सर्व बालके उपस्थित होती. तपासणीदरम्यान बहुतांश बालके व्यवस्थित चालू शकत असल्याचे दिसून आले, तर १० नवीन बालरुग्णांचीही तपासणी करण्यात आली. या मासिक शिबिरांमुळे अशा प्रकारच्या अस्थिविकारांनी ग्रस्त इतर बालकांनाही तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी आणि मार्गदर्शन मिळणार आहे. विशेष म्हणजे, अस्थिरोगतज्ज्ञ असलेले खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी स्वतः शस्त्रक्रिया झालेल्या बालकांची तपासणी करून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. त्यांनी पालकांना मुलांसाठी आवश्यक व्यायाम, पुनर्वसन प्रक्रिया आणि घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच गरजू बालकांना अस्थिरोगविषयक आधार उपकरणांचे वितरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. या अभियानामुळे जिल्ह्यातील दिव्यांग बालकांना नवजीवन मिळत असून, पालघरला ‘विकलांगता मुक्त’ करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Previous Post

बेस्टच्या १४ बसमार्गांत ५ ऑक्टोबरपासून बदल; काही मार्ग रद्द, तर काही मार्गांवर अतिरिक्त फेऱ्या!

BreakingNews

जिल्हा प्रशासनाच्या ‘विकलांगता मुक्त’ मोहिमेला मोठे यश; शस्त्रक्रियेनंतर १८ बालकांनी टाकले पहिले पाऊल

बेस्टच्या १४ बसमार्गांत ५ ऑक्टोबरपासून बदल; काही मार्ग रद्द, तर काही मार्गांवर अतिरिक्त फेऱ्या!

जंतर मंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील ११ मेट्रो स्थानकांचे प्रवेश-द्वार बंद!

‘सेवा संकल्प’ शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; एकाच छताखाली विविध शासकीय सेवांचा लाभ

२ ऑक्टोबरपासून मुंबईत डिजिटल आरोग्य क्रांती; लाखो नागरिकांचे ‘आभा’ कार्ड तयार करण्याचे पालिकेचे लक्ष्य!

पावसाच्या कमतरतेचा फटका; किरकोळ बाजारात एक लिंबू १० रुपयांना!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.