Lokrakshanay
Friday, October 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

‘सेवा संकल्प’ शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; एकाच छताखाली विविध शासकीय सेवांचा लाभ

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 2, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
‘सेवा संकल्प’ शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; एकाच छताखाली विविध शासकीय सेवांचा लाभ
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील यशस्वी कारकीर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणि “सेवा परमो धर्मः” या संकल्पनेतून राज्य शासनाने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबविले आहे. या अभियानांतर्गत १ ऑक्टोबर २०२६ रोजी भिवंडी तालुक्यातील मंडळ शेलार अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयात मंडळस्तरीय विशेष ‘सेवा संकल्प’ शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप आणि तहसीलदार अभिजीत खोले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात महसूल, कृषी, ग्रामविकास आणि इतर विभागांनी एकत्रितपणे नागरिकांना विविध शासकीय सेवा उपलब्ध करून दिल्या. शिबिराला महसूल नायब तहसीलदार आदेश म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विविध विभागांतील अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेत त्यावर जागेवरच मार्गदर्शन व आवश्यक कार्यवाही केली. महसूल विभागामार्फत ७६ सातबारा उतारे, २५ फेरफार उतारे, १४ आठ-अ उतारे, २७ नमुना ७/इ व १२/इ (वनपट्टे) उतारे, ४ नकाशा नक्कली, ३ माहितीचा अधिकार अर्ज आणि २ गावठाण सनदींचे वाटप करण्यात आले. याशिवाय १२ वनपट्टे केवायसी, महिला शेतकरी योजनेचे १६ लाभ, १२ पाणंद रस्ते विषयक कामे, १ कलम ४३ सुधारणा प्रकरण आणि २ ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी तयार करण्यात आले.

ग्रामपंचायत विभागामार्फत ५ मृत्यू दाखले, २ विवाह नोंदणी प्रमाणपत्रे आणि १४ रहिवासी दाखल्यांचे तात्काळ वितरण करण्यात आले. कृषी विभागाने १२ शेतकऱ्यांना महाकृषी ॲप तसेच ३ शेतकऱ्यांना महाविस्तार ॲप संदर्भात मार्गदर्शन व नोंदणी सुविधा उपलब्ध करून दिली. महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना सोप्या भाषेत देण्यात आली, तसेच प्रलंबित प्रश्नांवर जागेवरच योग्य ती कार्यवाही करण्यात आली. मंडळ शेलार परिसरातील शेतकरी, नागरिक आणि लाभार्थ्यांना विविध दाखले, महसूलविषयक कागदपत्रे आणि शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध झाल्याने त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम यांची मोठी बचत झाली. पंचक्रोशीतील नागरिकांनी या शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. “शासकीय सेवा थेट नागरिकांच्या दारी” पोहोचविणे, प्रशासनात सुलभता, गती आणि पारदर्शकता आणणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश असून, या शिबिरातून तो प्रभावीपणे साध्य झाल्याचे दिसून आले. नागरिकांनी प्रशासनाच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत अशा शिबिरांचे आयोजन नियमितपणे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रशासनालाही नागरिकांच्या अडचणी त्वरित सोडवून लोकाभिमुख सेवा देण्याचे समाधान या उपक्रमातून लाभल्याची भावना अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

Previous Post

२ ऑक्टोबरपासून मुंबईत डिजिटल आरोग्य क्रांती; लाखो नागरिकांचे ‘आभा’ कार्ड तयार करण्याचे पालिकेचे लक्ष्य!

Next Post

जंतर मंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील ११ मेट्रो स्थानकांचे प्रवेश-द्वार बंद!

Next Post
जंतर मंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील ११ मेट्रो स्थानकांचे प्रवेश-द्वार बंद!

जंतर मंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील ११ मेट्रो स्थानकांचे प्रवेश-द्वार बंद!

BreakingNews

बेस्टच्या १४ बसमार्गांत ५ ऑक्टोबरपासून बदल; काही मार्ग रद्द, तर काही मार्गांवर अतिरिक्त फेऱ्या!

जंतर मंतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील ११ मेट्रो स्थानकांचे प्रवेश-द्वार बंद!

‘सेवा संकल्प’ शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; एकाच छताखाली विविध शासकीय सेवांचा लाभ

२ ऑक्टोबरपासून मुंबईत डिजिटल आरोग्य क्रांती; लाखो नागरिकांचे ‘आभा’ कार्ड तयार करण्याचे पालिकेचे लक्ष्य!

पावसाच्या कमतरतेचा फटका; किरकोळ बाजारात एक लिंबू १० रुपयांना!

१ ऑक्टोबर उजाडला आणि नियम बदलला! आता मालमत्तेच्या व्यवहारासाठी ‘हे’ कार्ड बंधनकारक; सरकारने काय आदेश दिला?

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.