Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पावसाच्या कमतरतेचा फटका; किरकोळ बाजारात एक लिंबू १० रुपयांना!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 1, 2026
in ताज्या बातम्या, नवी मुंबई, महाराष्ट्र
पावसाच्या कमतरतेचा फटका; किरकोळ बाजारात एक लिंबू १० रुपयांना!
Share on FacebookShare on Whatsapp

नवी मुंबई : रोजच्या स्वयंपाकात तसेच हॉटेल, ज्यूस सेंटर आणि खाद्य व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या लिंबाच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. काही दिवसांपूर्वी १० रुपयांना ३ ते ४ लिंबू सहज मिळत होते. मात्र, सध्या लिंबाच्या दरात मोठी वाढ झाली असून, किरकोळ बाजारात १० रुपयांना एकच लिंबू मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला अतिरिक्त भार सहन करावा लागत आहे. वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मध्ये लिंबाची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. सध्या बाजारात दररोज केवळ २ ते ३ गाड्या लिंबाची आवक होत असून, या माध्यमातून सुमारे १५० क्विंटल लिंबू बाजारात दाखल होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. आवक कमी झाल्यामुळे घाऊक बाजारातही लिंबाच्या दरात वाढ झाली आहे.

वाशी एपीएमसी बाजारात लिंबाचा पुरवठा प्रामुख्याने आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातून केला जातो. मात्र, सध्या प्रमुख उत्पादक भागांमधून येणाऱ्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मुंबई बाजारातील लिंबाची आवक कमी झाली असून, त्याचा थेट परिणाम दरांवर झाला असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मुंबई एपीएमसीतील लिंबाचा सरासरी घाऊक दर सुमारे ५ हजार रुपये प्रतिक्विंटल होता. त्यानंतर दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळाले. १८ सप्टेंबर रोजी लिंबाचा सरासरी दर वाढून ७ हजार रुपये प्रतिक्विंटल झाला होता. तर २३ सप्टेंबरला हा दर ६ हजार रुपये प्रतिक्विंटल नोंदवण्यात आला. २४ सप्टेंबरला दर पुन्हा ५ हजार रुपये प्रतिक्विंटलवर आला असला तरी महिन्याच्या सुरुवातीच्या तुलनेत बाजारातील दर अजूनही जास्त आहेत. व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, यंदा कमी पावसामुळे लिंबाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. उत्पादन घटल्याने बाजारातील आवक कमी झाली असून, दुसरीकडे मागणी कायम असल्याने दर वाढले आहेत. याशिवाय वाहतूक खर्च, मालाची हाताळणी आणि विक्रेत्यांचा वाढलेला खर्च यामुळे किरकोळ बाजारातील लिंबाचे दर आणखी वाढले आहेत. परिणामी, घरगुती ग्राहकांसह हॉटेल आणि खाद्य व्यवसायांनाही या दरवाढीचा फटका बसत आहे.

Previous Post

१ ऑक्टोबर उजाडला आणि नियम बदलला! आता मालमत्तेच्या व्यवहारासाठी ‘हे’ कार्ड बंधनकारक; सरकारने काय आदेश दिला?

BreakingNews

पावसाच्या कमतरतेचा फटका; किरकोळ बाजारात एक लिंबू १० रुपयांना!

१ ऑक्टोबर उजाडला आणि नियम बदलला! आता मालमत्तेच्या व्यवहारासाठी ‘हे’ कार्ड बंधनकारक; सरकारने काय आदेश दिला?

अर्थमंत्र्यांच्या ‘त्या’ आश्वासनाने व्यापाऱ्यांचा युटर्न; २ ऑक्टोबरचा ‘नो UPI डे’ रद्द!

शुभमन गिलचा विश्वविक्रमांचा धडाका! २२३ धावांच्या वादळी खेळीने भारताचा विक्रमी विजय

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.