Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

अर्थमंत्र्यांच्या ‘त्या’ आश्वासनाने व्यापाऱ्यांचा युटर्न; २ ऑक्टोबरचा ‘नो UPI डे’ रद्द!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
October 1, 2026
in ताज्या बातम्या, देश -विदेश, महाराष्ट्र
अर्थमंत्र्यांच्या ‘त्या’ आश्वासनाने व्यापाऱ्यांचा युटर्न; २ ऑक्टोबरचा ‘नो UPI डे’ रद्द!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : UPI व्यवहारांवर लागू होणाऱ्या प्रस्तावित MDR (Merchant Discount Rate) विरोधात व्यापारी आक्रमक झाले होते. यासाठी २ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘नो UPI डे’ आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. मात्र आता या आंदोलनाबाबत मोठी अपडेट समोर आली असून व्यापाऱ्यांनी हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. बैठकीत व्यापाऱ्यांनी २,००० रुपयांपेक्षा अधिक UPI व्यवहारांवर प्रस्तावित ०.४० टक्के MDR लागू करण्याबाबत आपल्या चिंता मांडल्या.

चांदनी चौकचे खासदार आणि कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) चे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली सुमारे २० वरिष्ठ व्यापारी नेत्यांच्या शिष्टमंडळाने नवी दिल्लीतील कर्तव्य भवन येथे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. या बैठकीत डिजिटल पेमेंट, व्यापाऱ्यांवरील संभाव्य आर्थिक भार आणि UPI धोरणांवर सविस्तर चर्चा झाली. बैठकीनंतर AICPDF आणि AIMRA या संघटनांनी २ ऑक्टोबरला प्रस्तावित केलेला ‘नो UPI डे’चा निर्णय मागे घेण्याची घोषणा केली. या प्रतिनिधी मंडळात ऑल इंडिया कंझ्युमर प्रॉडक्ट्स फेडरेशन (AICPDF) चे अध्यक्ष धैर्यशील पाटील, ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशन (AIMRA) चे अध्यक्ष कैलाश लखियानी आणि ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ्स फेडरेशन चे अध्यक्ष पंकज अरोरा यांच्यासह विविध क्षेत्रातील व्यापारी नेत्यांचा समावेश होता. व्यापारी संघटनांनी स्पष्ट केले की त्यांचा डिजिटल पेमेंट किंवा UPI ला विरोध नाही. मात्र प्रस्तावित MDR मुळे विशेषतः लहान आणि मध्यम व्यापाऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो, अशी त्यांची चिंता आहे. डिजिटल व्यवहारांना चालना देताना व्यापाऱ्यांच्या हिताचेही संरक्षण झाले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. अर्थमंत्र्यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या असून सरकार सर्व घटकांच्या हिताचा विचार करून डिजिटल अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले. व्यापारी संघटनांनीही सरकारसोबत संवाद सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले असून UPI आणि डिजिटल व्यवहारांसाठी संतुलित धोरण तयार होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

 

Previous Post

शुभमन गिलचा विश्वविक्रमांचा धडाका! २२३ धावांच्या वादळी खेळीने भारताचा विक्रमी विजय

Next Post

१ ऑक्टोबर उजाडला आणि नियम बदलला! आता मालमत्तेच्या व्यवहारासाठी ‘हे’ कार्ड बंधनकारक; सरकारने काय आदेश दिला?

Next Post
१ ऑक्टोबर उजाडला आणि नियम बदलला! आता मालमत्तेच्या व्यवहारासाठी ‘हे’ कार्ड बंधनकारक; सरकारने काय आदेश दिला?

१ ऑक्टोबर उजाडला आणि नियम बदलला! आता मालमत्तेच्या व्यवहारासाठी 'हे' कार्ड बंधनकारक; सरकारने काय आदेश दिला?

BreakingNews

पावसाच्या कमतरतेचा फटका; किरकोळ बाजारात एक लिंबू १० रुपयांना!

१ ऑक्टोबर उजाडला आणि नियम बदलला! आता मालमत्तेच्या व्यवहारासाठी ‘हे’ कार्ड बंधनकारक; सरकारने काय आदेश दिला?

अर्थमंत्र्यांच्या ‘त्या’ आश्वासनाने व्यापाऱ्यांचा युटर्न; २ ऑक्टोबरचा ‘नो UPI डे’ रद्द!

शुभमन गिलचा विश्वविक्रमांचा धडाका! २२३ धावांच्या वादळी खेळीने भारताचा विक्रमी विजय

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.