Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

‘आम्ही चिखल तुडवला, काही लोक व्हॅनिटी व्हॅनने आले..’-मुख्यमंत्री

इर्शाळवाडी दरड दुर्घटनेच्या पाहणीवरून मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोला

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 29, 2023
in ठाणे
‘आम्ही चिखल तुडवला, काही लोक व्हॅनिटी व्हॅनने आले..’-मुख्यमंत्री
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : राज्यातील पूरस्थितीवर शुक्रवारी विधानसभेत चर्चा झाली. शेतकऱ्यांना आणि नैसर्गिक आपत्तीत नुकसान ओढवलेल्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी विरोधकांनी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत तुफान फटकेबाजी केली. पूरस्थितीवर बोलता बोलता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इर्शाळवाडी दरड दुर्घटनेला हात घातला. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. आम्ही चिखल तुडवत इर्शाळवाडीत गेलो. तर काही लोक तिकडे व्हॅनिटी व्हॅन घेऊन आले होते, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
इर्शाळवाडीची दुर्घटना झाली. सरकार त्यांच्या पाठी राहिलं. ज्या ज्या ठिकाणी पूर आला, अतिवृष्टी झाली त्यांच्या पाठी सरकार राहिलं आहे. सरकार सर्वांच्या पाठी राहत असतं. माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी एवढ्या पुरतं हे सरकार मर्यादित नाही. हे सरकार सामान्य जनतेचं सरकार आहे. म्हणून आम्ही तातडीने नुकसानग्रस्तांना पैसे दिले. त्यांना तिष्ठत ठेवले नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
केवळ देखावा नाही..
शेतकरी जेव्हा अडचणीत येतो, सामान्य माणूस अडचणीत येतो, तेव्हा तेव्हा त्यांच्या पाठी आपण उभे राहतो. आपण दुर्घटनास्थळी गेल्यावर लोक खडबडून जागी होतात. मीही तिथे गेलो. फार कठिण परिस्थिती होती. पण काही लोक व्हॅनिटी व्हॅनमधून आले होते. माझ्यासह काही लोक चिखल तुडवत गेले. मी गेलो म्हणून मोठेपणा सांगत नाही. या दुर्घटनेच्या दिवशी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मी संपर्कात होतो. कंट्रोल रुमशी संपर्कात होतो. मोठी यंत्रणा तिकडे होती. त्यामुळे मदत झाली. आम्ही केवळ देखावा केला नाही, असा चिमटा त्यांनी काढला.
वर्क फ्रॉम होम नाहीये..
इर्शाळवाडीतील लोकांची आम्ही कंटेनरमध्ये राहण्याची व्यवस्था केली. त्यांच्या संडास, बाथरूमची व्यवस्था केली. आम्ही एवढ्यावरच थांबलो नाही. या लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी आम्ही भूखंड पाहिला. या भूखंडावर सिडकोला तातडीने घरे बांधून देण्यास सांगितले. आम्ही बोलून थांबत नाही. आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारे लोक आहोत. वर्क फ्रॉम होम नाहीये हे, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला.

Previous Post

आनंदाची बातमी : भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळण्यासाठी तंदुरुस्त

Next Post

मुंबई-नाशिक महामार्गाच्या कामाला गती द्या, वाडा-भिवंडी रस्ता खड्डे मुक्त करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post
मुंबई-नाशिक महामार्गाच्या कामाला गती द्या, वाडा-भिवंडी रस्ता खड्डे मुक्त करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई-नाशिक महामार्गाच्या कामाला गती द्या, वाडा-भिवंडी रस्ता खड्डे मुक्त करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

BreakingNews

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णधडाका; महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने चीनला हरवत पटकावले सातवे सुवर्ण

दुष्काळावर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ६,७२८ कोटींचा निधी; मंत्री भरत गोगावले यांची माहिती

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.