Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

ठाण्यात स्वातंत्र्यदिनी रंगणार श्वानांची अनोखी देशभक्ती; ‘स्वातंत्र्य दिन पेट परेड’चे आयोजन!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 12, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
ठाण्यात स्वातंत्र्यदिनी रंगणार श्वानांची अनोखी देशभक्ती; ‘स्वातंत्र्य दिन पेट परेड’चे आयोजन!
Share on FacebookShare on Whatsapp

ठाणे : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत ठाण्यात यंदाही अनोख्या पद्धतीने देशभक्तीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. ‘डॉग्स वर्ल्ड इंडिया’च्या वतीने शनिवार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता ‘स्वातंत्र्य दिन पेट परेड’चे आयोजन करण्यात आले असून, देशभक्ती आणि पाळीव प्राण्यांप्रती संवेदनशीलता यांचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळणार आहे. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे (पश्चिम) येथून या परेडला सुरुवात होऊन ती ‘डॉग्स वर्ल्ड इंडिया’ येथे समाप्त होणार आहे. ठाणे शहरात उपवन महोत्सव, पेट फेस्ट यांसारख्या विविध उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो. त्याच परंपरेला पुढे नेत स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणारी ही पेट परेड शहरातील प्राणीप्रेमी आणि नागरिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

या परेडची सुरुवात २०२२ मध्ये करण्यात आली होती. पहिल्याच वर्षी २०० हून अधिक पाळीव प्राणी आणि त्यांच्या पालकांनी यात सहभाग घेतला होता. त्यानंतर हा उपक्रम दरवर्षी अधिक लोकप्रिय होत असून, आता तो ठाण्यातील प्राणीप्रेमींसाठी वार्षिक परंपरा बनला आहे. यंदाच्या परेडमध्ये विविध जातींचे श्वान, मांजरी तसेच इतर पाळीव प्राणी आपल्या मालकांसोबत देशभक्तीपर वेशभूषेत सहभागी होणार आहेत. अनेक प्राण्यांना तिरंग्याच्या रंगातील आकर्षक पोशाख परिधान करण्यात येणार असून, त्यांच्या मालकांच्या हातात तिरंगा आणि देशभक्तीपर घोषणांच्या गजरात ही परेड पार पडणार आहे. त्यामुळे रस्त्यावर देशभक्तीचे वातावरण निर्माण होण्याबरोबरच पाळीव प्राण्यांच्या आकर्षक वेशभूषेचीही अनोखी झलक पाहायला मिळणार आहे. आयोजक प्रमोद निंबाळकर यांनी पाळीव प्राण्यांचे पालक आणि प्राणीप्रेमींनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले असून, स्वातंत्र्यदिनाचा उत्सव वेगळ्या आणि संस्मरणीय पद्धतीने साजरा करण्याची संधी नागरिकांना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous Post

गोष्टी आणि कलेच्या माध्यमातून घडणार विद्यार्थ्यांचे भविष्य; पालघर जिल्हा परिषदेचा ‘कहानी-कला-खुशी’ उपक्रम!

Next Post

सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांची नोंद होणार; ‘फार्मर आयडी’चा मार्ग मोकळा – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Next Post
सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांची नोंद होणार; ‘फार्मर आयडी’चा मार्ग मोकळा – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांची नोंद होणार; ‘फार्मर आयडी’चा मार्ग मोकळा - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

BreakingNews

२ ऑक्टोबरपासून मुंबईत डिजिटल आरोग्य क्रांती; लाखो नागरिकांचे ‘आभा’ कार्ड तयार करण्याचे पालिकेचे लक्ष्य!

पावसाच्या कमतरतेचा फटका; किरकोळ बाजारात एक लिंबू १० रुपयांना!

१ ऑक्टोबर उजाडला आणि नियम बदलला! आता मालमत्तेच्या व्यवहारासाठी ‘हे’ कार्ड बंधनकारक; सरकारने काय आदेश दिला?

अर्थमंत्र्यांच्या ‘त्या’ आश्वासनाने व्यापाऱ्यांचा युटर्न; २ ऑक्टोबरचा ‘नो UPI डे’ रद्द!

शुभमन गिलचा विश्वविक्रमांचा धडाका! २२३ धावांच्या वादळी खेळीने भारताचा विक्रमी विजय

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.