Lokrakshanay
Saturday, July 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ठाणे

डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी महाराष्ट्र बंद; आयएमएचा २४ तास वैद्यकीय सेवा बंदचा निर्णय

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 18, 2026
in ठाणे, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी महाराष्ट्र बंद; आयएमएचा २४ तास वैद्यकीय सेवा बंदचा निर्णय
Share on FacebookShare on Whatsapp

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) महाराष्ट्र शाखेने सोमवारी राज्यभर २४ तास वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा राज्यव्यापी लाक्षणिक बंद सोमवारी सकाळी ६ वाजल्यापासून मंगळवारी सकाळी ६ वाजेपर्यंत पाळला जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील नियमित आरोग्य सेवा, बाह्यरुग्ण विभाग (OPD), नियोजित शस्त्रक्रिया आणि नियमित वैद्यकीय तपासण्यांवर परिणाम होणार असला, तरी रुग्णांचे हाल होऊ नयेत म्हणून आपत्कालीन सेवा, अतिदक्षता विभाग (ICU), प्रसूती सेवा आणि इतर जीवनावश्यक उपचार नेहमीप्रमाणे सुरू राहतील, असे आयएमएने स्पष्ट केले आहे. शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉ. सृष्टी बाविस्कर आणि डॉ. वैभव साळुंखे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राज्यभरातील डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी, राज्य सचिव डॉ. विक्रांत देसाई आणि राज्य खजिनदार डॉ. अमोल गिते यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक घेण्यात आली. राज्यभरातील हजारो डॉक्टरांनी या बैठकीत सहभाग नोंदवला आणि डॉक्टरांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी राज्यव्यापी लाक्षणिक बंद पुकारण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांबाबत आता कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी भूमिका आयएमएने स्पष्ट केली आहे.

आयएमएने राज्य सरकारसमोर डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आणि दोषींवर कठोर कारवाईसाठी अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. संबंधित हल्ल्याप्रकरणी कोणताही राजकीय हस्तक्षेप न होता दोषींवर कठोर आणि निष्पक्ष कायदेशीर कारवाई करावी, महाराष्ट्र मेडिकेअर सेवा व्यक्ती व मेडिकेअर सेवा संस्था अधिनियम २०१० मध्ये तातडीने प्रभावी सुधारणा कराव्यात, डॉक्टरांवरील गंभीर हल्ले आणि शस्त्रांचा वापर करून केलेले गुन्हे दखलपात्र व अजामीनपात्र घोषित करावेत, अशा प्रकरणांची चौकशी ३० ते ६० दिवसांत पूर्ण करून जलदगती न्यायालयात सुनावणी घ्यावी, रुग्णालयांच्या नुकसानीची भरपाई आणि पीडित कर्मचाऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची कायदेशीर तरतूद करावी, तसेच रुग्णालयांमध्ये कायमस्वरूपी प्रभावी सुरक्षा व्यवस्था उभारावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. सरकारने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास ९ ऑगस्टपासून राज्यभर बेमुदत बंद आंदोलन सुरू करण्याचा इशाराही आयएमएने दिला आहे. या आंदोलनात केवळ ॲलोपॅथी क्षेत्रातील डॉक्टरच नव्हे, तर आयुर्वेद, होमिओपॅथी आणि इतर वैद्यकीय शाखांतील डॉक्टर, विविध पॅरामेडिकल संघटना, परिचारिका संघटना, औषध विक्रेते आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी संघटनांनीही पाठिंबा जाहीर केला असून, त्यामुळे सोमवारी राज्यातील नियमित वैद्यकीय सेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

 

Previous Post

सोमवारपासून मध्य रेल्वे धावणार नव्या गतीने; १५ डब्यांच्या गाड्यांच्या फेऱ्या २२ वरून ३२ वर

Next Post

“रुग्णांनी हातात सलाईन घेऊन बाहेर पडायचे का?” एफडीएच्या धडक कारवाईवर मुंबई हायकोर्टाचे संतप्त सवाल

Next Post
“रुग्णांनी हातात सलाईन घेऊन बाहेर पडायचे का?” एफडीएच्या धडक कारवाईवर मुंबई हायकोर्टाचे संतप्त सवाल

"रुग्णांनी हातात सलाईन घेऊन बाहेर पडायचे का?" एफडीएच्या धडक कारवाईवर मुंबई हायकोर्टाचे संतप्त सवाल

BreakingNews

पालघर जिल्ह्यात आधुनिक आधार सेवा केंद्र सुरू; सर्व सुविधा एकाच छताखाली!

“रुग्णांनी हातात सलाईन घेऊन बाहेर पडायचे का?” एफडीएच्या धडक कारवाईवर मुंबई हायकोर्टाचे संतप्त सवाल

डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी महाराष्ट्र बंद; आयएमएचा २४ तास वैद्यकीय सेवा बंदचा निर्णय

सोमवारपासून मध्य रेल्वे धावणार नव्या गतीने; १५ डब्यांच्या गाड्यांच्या फेऱ्या २२ वरून ३२ वर

ठाण्यातील सहा अनधिकृत मसाला गिरण्या अखेर बंद; प्रदूषणातून नागरिकांना दिलासा!

अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधत मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.