Lokrakshanay
Tuesday, July 14, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

अमेरिका-इराण पुन्हा युद्ध पेटले; होर्मुज सामुद्रधुनी बंद!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 13, 2026
in ताज्या बातम्या, देश -विदेश
अमेरिका-इराण पुन्हा युद्ध पेटले; होर्मुज सामुद्रधुनी बंद!
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धबंदी कोलमडल्यानंतर मध्य पूर्वेतील तणाव पुन्हा एकदा तीव्र झाला असून आखातातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत आहे. अमेरिकेने इराणमधील सुमारे १४० लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ले केल्यानंतर इराणनेही अमेरिकेचे मित्र राष्ट्र असलेल्या आखाती देशांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले चढवले आहेत. या वाढत्या संघर्षादरम्यान इराणने पुढील सूचना मिळेपर्यंत होर्मुज सामुद्रधुनी बंद करण्याची घोषणा केली असून, त्याचा जागतिक तेल पुरवठा आणि इंधनाच्या किमतींवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, होर्मुज सामुद्रधुनीत सायप्रसचा ध्वज असलेल्या एका व्यापारी जहाजावर इराणने हल्ला केल्याने जहाजाला आग लागली, त्याचे इंजिन निकामी झाले आणि जहाजावरील एक कर्मचारी बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली. या घटनेनंतर अमेरिकेने पहाटेच्या सुमारास इराणमधील लष्करी तळ, क्षेपणास्त्र प्रणाली आणि अन्य महत्त्वाच्या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणावर बॉम्बहल्ले केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार करण्यात आलेली ही या आठवड्यातील तिसरी लष्करी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यांनंतर बुशेहर, अलायुसे, चाबहार, बंदर अब्बास, सीरीक, केशम आणि जास्क या भागांत स्फोटांचे आवाज ऐकू आल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर इराणने जॉर्डनमधील प्रिन्स हसन एअर बेस, कुवेतमधील अमेरिकेची पॅट्रियट हवाई संरक्षण प्रणाली व रडार केंद्रे, तसेच बहरिनमधील अमेरिकन लष्करी दळणवळण केंद्रावर हल्ल्यांचा दावा केला. याशिवाय कतार आणि संयुक्त अरब अमिरातीच्या दिशेनेही क्षेपणास्त्रे व ड्रोन डागण्यात आल्याचे वृत्त आहे. जॉर्डनमधील कमांड सेंटर उद्ध्वस्त केल्याचाही दावा इराणकडून करण्यात आला आहे. या घडामोडींमुळे आखातातील सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीबाबत चिंता वाढली आहे.

दरम्यान, युद्ध सुरू असतानाच उपग्रह प्रतिमांच्या आधारे इराण पारचिनसह काही अणुस्थळांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करत असल्याचे दावे समोर आले आहेत. अमेरिकेने हे सामंजस्य कराराचे उल्लंघन असल्याचा आरोप केला असून, इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी त्याला प्रत्युत्तर देताना अमेरिका स्वतःच कराराचे उल्लंघन करत असल्याचा दावा केला आहे. दोन्ही बाजूंनी कराराच्या अटींचे पालन झाल्यासच तो प्रभावी राहू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या निधनानंतर पदभार स्वीकारलेल्या मुजतबा खामेनी यांनी पहिल्यांदाच सार्वजनिक भूमिका मांडत वडिलांच्या आणि युद्धात मृत्यू झालेल्या लोकांच्या मृत्यूचा बदला घेतला जाईल, असा इशारा दिला आहे. दुसरीकडे होर्मुज सामुद्रधुनीवरील नियंत्रणाच्या मुद्द्यावरूनही वाद अधिक तीव्र झाला आहे. इराणची भूमिका अशी होती की सर्व जहाजांनी त्याने निश्चित केलेल्या मार्गानेच प्रवास करावा आणि इराणच्या सागरी प्राधिकरणाकडे नोंदणी करावी. मात्र ओमानने आपल्या किनाऱ्यालगत पर्यायी सागरी मार्ग उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक जहाजांना इराणच्या नियंत्रणाखालील मार्ग टाळणे शक्य झाले. त्यामुळे होर्मुज सामुद्रधुनीवरील आपले नियंत्रण आणि भविष्यातील धोरणात्मक प्रभाव कमी होईल, अशी चिंता इराणने व्यक्त केली आहे. या सर्व घडामोडींमुळे जागतिक ऊर्जा बाजार, तेलाच्या किमती आणि मध्य पूर्वेतील सुरक्षा परिस्थितीवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

Previous Post

आषाढी वारीत दुर्दैवी दुर्घटना; जेजुरीजवळ दिंडीला ट्रकची धडक, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू!

Next Post

नंदुरबार शासकीय वसतिगृहातील ४० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विषबाधा

Next Post
नंदुरबार शासकीय वसतिगृहातील ४० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विषबाधा

नंदुरबार शासकीय वसतिगृहातील ४० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विषबाधा

BreakingNews

एसटी डेपोच्या पुनर्विकासातून एसटी महामंडळ सक्षम करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नंदुरबार शासकीय वसतिगृहातील ४० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विषबाधा

अमेरिका-इराण पुन्हा युद्ध पेटले; होर्मुज सामुद्रधुनी बंद!

आषाढी वारीत दुर्दैवी दुर्घटना; जेजुरीजवळ दिंडीला ट्रकची धडक, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू!

ऑनलाइन अॅपवरून घराची साफसफाई पडली महागात; ठाण्यातील घरातून साडेतीन लाखांचे दागिने लंपास!

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; मतदार नोंदणीसाठी पालकांचा SIR तपशील अनिवार्य!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.