Lokrakshanay
Sunday, August 30, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

नंदुरबार शासकीय वसतिगृहातील ४० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विषबाधा

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 13, 2026
in ताज्या बातम्या, देश -विदेश, महाराष्ट्र
नंदुरबार शासकीय वसतिगृहातील ४० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विषबाधा
Share on FacebookShare on Whatsapp

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील समाजकल्याण विभागाच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळा व वसतिगृहात रविवारी १२ जुलै रात्री अन्नातून विषबाधा झाल्याची गंभीर घटना घडली. रात्रीचे जेवण केल्यानंतर ४० ते ५० विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या आणि अस्वस्थता जाणवू लागल्याने एकच खळबळ उडाली. सर्व विद्यार्थ्यांना तातडीने शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी देविदास बाशिंगे, पार्थ धिवरे, आदित्य सूर्यवंशी, पंकज कुवर, प्रदीप आणि मनोहर पाटील या सहा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. रविवारी सायंकाळी वसतिगृहातील २१७ हून अधिक विद्यार्थ्यांनी शेवग्याची भाजी, भात आणि पोळ्यांचे जेवण केले होते.

काही वेळातच अनेक विद्यार्थ्यांना उलट्या सुरू झाल्या, तर काही विद्यार्थी जागीच कोसळल्याने वसतिगृहात धावपळ उडाली. रुग्णवाहिका आणि इतर वाहनांच्या मदतीने बाधित विद्यार्थ्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. उर्वरित विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच पालकांनी रुग्णालयात धाव घेत वसतिगृह प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला. विद्यार्थ्यांनीही वसतिगृहात वारंवार निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याची तक्रार करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. तक्रार करणाऱ्या विद्यार्थ्यांना दमदाटी केली जात असल्याचाही दावा त्यांनी केला. “जे विद्यार्थ्यांनी जेवण केले नव्हते, त्यांना कोणताही त्रास झाला नाही,” असे उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी, पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, प्रांताधिकारी दीपक गिरासे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल झाले. विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी अन्नाचे व उलट्यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून वसतिगृहातील समस्यांच्या निराकरणासाठी समिती स्थापन करून महिनाभरात आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या घटनेमुळे समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहांतील अन्नाची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Previous Post

अमेरिका-इराण पुन्हा युद्ध पेटले; होर्मुज सामुद्रधुनी बंद!

Next Post

एसटी डेपोच्या पुनर्विकासातून एसटी महामंडळ सक्षम करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post
एसटी डेपोच्या पुनर्विकासातून एसटी महामंडळ सक्षम करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एसटी डेपोच्या पुनर्विकासातून एसटी महामंडळ सक्षम करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

BreakingNews

ठाण्यात रिंग मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; ३० ऑगस्टला स्वाक्षरी मोहीम!

ChatGPT घेऊन आले ‘शेड्यूल टास्क’ फीचर; रोजची कामे आता एका क्लिकवर ऑटोमॅटिक होणार

‘कर्मचारी हेच आमचे कुटुंब’ – महापौर रितू तावडे; कर्मचाऱ्यांना राखी बांधत व्यक्त केली कृतज्ञता

खारघर हादरले! झेरॉक्स दुकानात सापडले ३,४०० अधिकृत मतदार फॉर्म

“तुम्ही आहात म्हणून आम्ही सुरक्षित!”; ८ हजार राख्यांद्वारे पुणेकरांनी मानले देशरक्षकांचे आभार

मुलांच्या आधारचे बायोमेट्रिक अपडेट वेळेत करा; पालकांना जिल्हा परिषदेचे आवाहन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.