Lokrakshanay
Sunday, August 30, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

‘कर्मचारी हेच आमचे कुटुंब’ – महापौर रितू तावडे; कर्मचाऱ्यांना राखी बांधत व्यक्त केली कृतज्ञता

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
August 29, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
‘कर्मचारी हेच आमचे कुटुंब’ – महापौर रितू तावडे; कर्मचाऱ्यांना राखी बांधत व्यक्त केली कृतज्ञता
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : रक्षाबंधन हा सण केवळ भाऊ-बहिणीच्या रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित नसून प्रेम, विश्वास, आपुलकी, काळजी आणि संरक्षणाचा अतूट धागा आहे, अशी भावना व्यक्त करत मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी महापौर निवासस्थानी कार्यरत कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधनाचा सण कौटुंबिक वातावरणात साजरा केला. भायखळा येथील महापौर निवासस्थानी शुक्रवारी (२८ ऑगस्ट २०२६) आयोजित या विशेष कार्यक्रमात आमदार चित्राताई वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. महापौर तावडे म्हणाल्या की, दिवस-रात्र नागरिकांच्या सेवेसाठी आणि महापौर बंगल्याच्या कामकाजासाठी सातत्याने मेहनत घेणारे सर्व कर्मचारी हे आमच्या कुटुंबाचाच एक अविभाज्य भाग आहेत. त्यामुळे रक्षाबंधनासारखा सण त्यांच्यासोबत साजरा करणे ही आनंदाची आणि समाधानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. सण-उत्सवाच्या काळातही कर्तव्यावर तत्पर राहून जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी महापौर रितू तावडे आणि आमदार चित्राताई वाघ यांनी सर्व कर्मचाऱ्यांना स्वतः राखी बांधली, औक्षण केले आणि त्यांच्या उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी तसेच दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात उपस्थित कर्मचाऱ्यांनीही या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करत महापौरांनी दाखविलेल्या आपुलकीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सणाचा आनंद, परस्परांतील विश्वास आणि कुटुंबवत्सल वातावरण जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. महापौर बंगल्यातील कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांनीही एकमेकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत हा सण उत्साहात साजरा केला. सण-उत्सवांमधून सामाजिक सलोखा, परस्पर सन्मान आणि सेवाभाव अधिक दृढ होतो, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. महापौर निवासस्थानी झालेल्या या साध्या पण भावनिक सोहळ्याने कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींमधील आत्मीयतेचे नाते अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Previous Post

खारघर हादरले! झेरॉक्स दुकानात सापडले ३,४०० अधिकृत मतदार फॉर्म

Next Post

ChatGPT घेऊन आले ‘शेड्यूल टास्क’ फीचर; रोजची कामे आता एका क्लिकवर ऑटोमॅटिक होणार

Next Post
ChatGPT घेऊन आले ‘शेड्यूल टास्क’ फीचर; रोजची कामे आता एका क्लिकवर ऑटोमॅटिक होणार

ChatGPT घेऊन आले 'शेड्यूल टास्क' फीचर; रोजची कामे आता एका क्लिकवर ऑटोमॅटिक होणार

BreakingNews

ठाण्यात रिंग मेट्रोला नागरिकांचा तीव्र विरोध; ३० ऑगस्टला स्वाक्षरी मोहीम!

ChatGPT घेऊन आले ‘शेड्यूल टास्क’ फीचर; रोजची कामे आता एका क्लिकवर ऑटोमॅटिक होणार

‘कर्मचारी हेच आमचे कुटुंब’ – महापौर रितू तावडे; कर्मचाऱ्यांना राखी बांधत व्यक्त केली कृतज्ञता

खारघर हादरले! झेरॉक्स दुकानात सापडले ३,४०० अधिकृत मतदार फॉर्म

“तुम्ही आहात म्हणून आम्ही सुरक्षित!”; ८ हजार राख्यांद्वारे पुणेकरांनी मानले देशरक्षकांचे आभार

मुलांच्या आधारचे बायोमेट्रिक अपडेट वेळेत करा; पालकांना जिल्हा परिषदेचे आवाहन

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.