Lokrakshanay
Monday, July 6, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

आषाढी वारीवर पुराचे संकट; वारकऱ्यांना ‘नो एन्ट्री’!

इंद्रायणी नदी धोक्याच्या पातळीबाहेर

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
July 6, 2026
in ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्र
आषाढी वारीवर पुराचे संकट; वारकऱ्यांना ‘नो एन्ट्री’!
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : आषाढी वारीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना आळंदीमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडत महापुराचे रूप धारण केले आहे. परिणामी, प्रशासनाने वारकरी, भाविक आणि नागरिकांसाठी आळंदीत प्रवेशावर तात्पुरती बंदी घालत ‘नो एन्ट्री’ जाहीर केली आहे. वारी सुरू होण्याच्या सुमारे ४८ तास आधीच हा निर्णय घेण्यात आल्याने हजारो वारकऱ्यांच्या नियोजनावर परिणाम झाला आहे. नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेल्याने आळंदीचा बाहेरील भागाशी संपर्क तुटला असून शहरात ये-जा करणे धोकादायक बनले आहे. प्रशासनाने प्रवास सुरू केलेल्या वारकऱ्यांना ज्या ठिकाणी आहेत, तेथेच सुरक्षित थांबण्याचे आणि आळंदीकडे येण्याचा प्रयत्न न करण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसामुळे विविध धर्मशाळा आणि दर्शन मंडपांमध्ये अडकलेल्या सुमारे २५० वारकऱ्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले होते. मात्र, काही ठिकाणी त्या भागातही पाणी शिरल्याची माहिती समोर आली आहे. नदीकाठी उभारण्यात आलेले चेंजिंग रूम तसेच अन्य तात्पुरत्या सुविधा पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. दरम्यान, आळंदीतील वादळी पावसामुळे झाड कोसळल्याच्या घटनाही घडल्या असून अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे केले.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनासाठी पूर्वतयारी केली असली, तरी सततच्या मुसळधार पावसामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. इंद्रायणी नदीच्या पुरामुळे शहरात प्रवेश करणारे सर्व पूल पाण्याखाली गेल्याने संपूर्ण परिसरात सतर्कता वाढविण्यात आली आहे. प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असून नागरिकांनी आणि वारकऱ्यांनी अधिकृत सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अफवांवर विश्वास न ठेवता नदीपात्र, घाट परिसर आणि बंद करण्यात आलेल्या पुलांच्या दिशेने जाणे टाळावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. दुसरीकडे, पुणे–मुंबई मार्गावर दरड कोसळल्यामुळे एसटी बस सेवा तात्पुरती बंद करण्यात आली असून राज्यातील अनेक भागांतील वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकरी आळंदीकडे रवाना होण्याची तयारी करत असताना निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, पुढील हवामानाचा अंदाज आणि पाण्याची पातळी लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतले जाणार आहेत.

 

Previous Post

दरड कोसळल्याने पुणे–मुंबई एसटी सेवा अनिश्चित काळासाठी बंद!

Next Post

वयाच्या ६१व्या वर्षी आमिर खानची तिसरी लग्नगाठ!

Next Post
वयाच्या ६१व्या वर्षी आमिर खानची तिसरी लग्नगाठ!

वयाच्या ६१व्या वर्षी आमिर खानची तिसरी लग्नगाठ!

BreakingNews

वयाच्या ६१व्या वर्षी आमिर खानची तिसरी लग्नगाठ!

आषाढी वारीवर पुराचे संकट; वारकऱ्यांना ‘नो एन्ट्री’!

दरड कोसळल्याने पुणे–मुंबई एसटी सेवा अनिश्चित काळासाठी बंद!

मुंबईत पावसाचा रेड अलर्ट: खासगी क्षेत्राला ‘WFH’, सरकारी कर्मचाऱ्यांना ‘हाफ डे’!

‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध, सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेत धडक कारवाई; पुणे-सोलापुरात सव्वा लाखांचा साठा जप्त!

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आंबेनळी घाट ५ दिवस बंद!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.