Lokrakshanay
Tuesday, August 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

जनगणना संपताच शिक्षकांचे प्रशिक्षण पुन्हा सुरू; शिक्षक प्रशिक्षणाचे नवे वेळापत्रक जारी!

१० जुलैपर्यंत तालुकास्तरीय प्रशिक्षण पूर्ण होणार

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 12, 2026
in ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्र
जनगणना संपताच शिक्षकांचे प्रशिक्षण पुन्हा सुरू; शिक्षक प्रशिक्षणाचे नवे वेळापत्रक जारी!
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : जनगणना २०२७ च्या कामांमध्ये शिक्षकांचा सहभाग असल्यामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या शिक्षक प्रशिक्षणाचे सुधारित वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) यांनी जाहीर केले आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरू असल्याने इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. एससीईआरटीच्या सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे यांनी प्रशिक्षणासंदर्भातील सविस्तर परिपत्रक प्रसिद्ध केले असून १० जुलैपर्यंत तालुकास्तरावरील सर्व प्रशिक्षण पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यापूर्वी दुसरी, तिसरी आणि चौथीच्या शिक्षकांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण पूर्ण झाले असून सहावीच्या शिक्षकांचे प्रशिक्षण अद्याप बाकी आहे. त्यासाठी १७ व १८ जून रोजी पूर्वतयारी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून २२ ते २५ जूनदरम्यान चार दिवसांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण होईल. त्यानंतर २९ जून ते २ जुलै या कालावधीत जिल्हास्तरीय आणि ४ ते १० जुलैदरम्यान तालुकास्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.

इयत्ता दुसरीच्या शिक्षकांसाठी तीन दिवसांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण १८ ते ३० जून, तर तालुकास्तरीय प्रशिक्षण २२ जून ते २ जुलैदरम्यान होणार आहे. तिसरी आणि चौथीच्या शिक्षकांसाठी १८ ते ३० जून या कालावधीत चार दिवसांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण आणि २४ जून ते ४ जुलैदरम्यान तालुकास्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणाची जबाबदारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) यांच्याकडे सोपविण्यात आली असून प्रत्येकी ६० शिक्षकांच्या गटानुसार प्रशिक्षणार्थींच्या तुकड्या तयार केल्या जाणार आहेत. आवश्यकतेनुसार एकापेक्षा अधिक टप्प्यांत प्रशिक्षण पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सहावीच्या राज्यस्तरीय प्रशिक्षक प्रशिक्षणासाठी मराठी माध्यमातील २४४ आणि उर्दू माध्यमातील २४० प्रशिक्षकांची आवश्यकता असून त्यांचा तपशील १५ जूनपर्यंत सादर करावा लागणार आहे. तसेच विशेष शिक्षक, साधन व्यक्ती, अनुभवी शिक्षक, व्याख्याते, पर्यवेक्षकीय अधिकारी आणि अभ्यासक्रम निर्मितीत सहभागी तज्ज्ञांचा प्रशिक्षण प्रक्रियेत समावेश करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Previous Post

एसटी कर्मचाऱ्यांचा २९ जूनपासून बेमुदत ‘चक्का जाम’चा इशारा!

Next Post

ठाण्यात २८ जून रोजी पल्स पोलिओ मोहिमेसाठी तयारी; दोन लाख बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट!

Next Post
ठाण्यात २८ जून रोजी पल्स पोलिओ मोहिमेसाठी तयारी; दोन लाख बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट!

ठाण्यात २८ जून रोजी पल्स पोलिओ मोहिमेसाठी तयारी; दोन लाख बालकांना लसीकरणाचे उद्दिष्ट!

BreakingNews

सातारा जिल्‍ह्यात येणार नवे ९७ उद्योग

महसुली प्रकरणांच्या तडजोडीसाठी १ सप्टेंबरपासून ‘महात्मा फुले महसूल लोक अदालत’ अभियान

स्वयंपाकाच्या गॅसबाबत केंद्र सरकारचा नवा नियम; ग्राहकांना मोठा दिलासा! गॅस कंपन्यांना दणका

पुण्यात ‘बर्गर किंग’सह १६ आस्थापनांना FDAचा दणका; किचनमधील अस्वच्छतेमुळे कारवाई

ठाण्यातील शतकमहोत्सवी ‘ऑफिसर्स क्लब’ला आधुनिकतेची झळाळी; स्वातंत्र्यदिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन!

रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळ! CSMT सह कल्याण, लोणावळा स्थानकांवरील पिण्याच्या पाण्यात ‘ई-कोलाय’ बॅक्टेरिया

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.