Lokrakshanay
Sunday, June 7, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

महागाईची झळ आता हेअरस्टाईललाही; राज्यात सलून सेवा २० टक्क्यांनी वाढली!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
June 6, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
महागाईची झळ आता हेअरस्टाईललाही; राज्यात सलून सेवा २० टक्क्यांनी वाढली!
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : देशभरात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित विस्कळीत झाले असतानाच आता सलून सेवांच्या दरवाढीचा आणखी एक फटका बसणार आहे. महाराष्ट्र नाभिक महामंडळाने राज्यभरातील सलून सेवांच्या शुल्कामध्ये २० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असून ही दरवाढ ६ जून २०२६ पासून लागू करण्यात आली आहे. त्यामुळे दाढी, केस कापणे आणि इतर सलून सेवांसाठी ग्राहकांना पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. महामंडळाच्या मते, जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इंधन दरांमध्ये झालेली वाढ, सौंदर्य प्रसाधने आणि सलूनमध्ये वापरल्या जाणाऱ्या साहित्याच्या वाढलेल्या किमती, व्यावसायिक वीजबिलांचा वाढलेला भार, दुकानांचे भाडे, कर्जाचे हप्ते आणि कर्मचाऱ्यांचे वेतन यामुळे सलून व्यवसायावर मोठा आर्थिक ताण निर्माण झाला आहे. सध्याच्या दरांमध्ये व्यवसाय चालवणे कठीण होत असल्याने दरवाढीचा निर्णय घेण्यात आल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे.

नवीन दरवाढीनुसार, पूर्वी १०० रुपये असलेले केस कापण्याचे शुल्क १२० रुपयांपर्यंत, तर ८० रुपये असलेली दाढीची सेवा १०० रुपयांपर्यंत जाऊ शकते. ग्राहकांच्या सोयीसाठी प्रीमियम, एसी, नॉन-एसी आणि ग्रामीण भागातील सलूनसाठी स्वतंत्र दरपत्रके लागू करण्यात येणार आहेत. सध्या प्रीमियम सलूनमध्ये दाढीसाठी २०० ते ५०० रुपये आणि केस कापण्यासाठी ५०० ते १००० रुपये आकारले जातात. एसी सलूनमध्ये दाढीचे दर १०० ते २०० रुपये आणि केस कापण्याचे दर १५० ते ३५० रुपये आहेत. नॉन-एसी सलूनमध्ये दाढीसाठी ५० ते ८० रुपये आणि केस कापण्यासाठी सुमारे १५० रुपये आकारले जातात, तर ग्रामीण भागातील सलूनमध्ये दाढीसाठी ५० ते ७० रुपये आणि केस कापण्यासाठी ८० ते १०० रुपये शुल्क आकारले जाते. महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे राज्याध्यक्ष सयाजी झुंजार यांनी ही दरवाढ नफा कमावण्यासाठी नसून सलून व्यावसायिकांचे आर्थिक अस्तित्व टिकवण्यासाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर या निर्णयामुळे ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून वाढीव दरांचा पुनर्विचार करण्याची मागणी होत आहे.

Previous Post

जिल्हा परिषदेत सीईओ रणजित यादव यांची आकस्मिक तपासणी; गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याचे निर्देश

Next Post

मुंबईवर दुहेरी पाणीसंकट; १० टक्के कपातीनंतर टँकर सेवा बंदची घोषणा!

Next Post
मुंबईवर दुहेरी पाणीसंकट; १० टक्के कपातीनंतर टँकर सेवा बंदची घोषणा!

मुंबईवर दुहेरी पाणीसंकट; १० टक्के कपातीनंतर टँकर सेवा बंदची घोषणा!

BreakingNews

एशियन गेम्ससाठी भारताचा दमदार संघ जाहीर; सूर्यकुमारसह १० खेळाडूंना डच्चू!

‘देऊळ बंद २’च्या यशाला मुख्यमंत्र्यांची दाद; चित्रपटाच्या टीमची सदिच्छा भेट

मुंबईवर दुहेरी पाणीसंकट; १० टक्के कपातीनंतर टँकर सेवा बंदची घोषणा!

महागाईची झळ आता हेअरस्टाईललाही; राज्यात सलून सेवा २० टक्क्यांनी वाढली!

जिल्हा परिषदेत सीईओ रणजित यादव यांची आकस्मिक तपासणी; गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याचे निर्देश

अननस खाण्याचे ‘हे’ ५ जबरदस्त फायदे माहित आहेत का?

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.