Lokrakshanay
Wednesday, July 22, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मुंबईत CNG-PNG दरवाढीचा आणखी झटका; १५ दिवसांत दुसऱ्यांदा वाढ

CNG ८६ रुपये प्रतिकिलो, PNG ५२ रुपये प्रति SCM

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 30, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
मुंबईत CNG-PNG दरवाढीचा आणखी झटका; १५ दिवसांत दुसऱ्यांदा वाढ
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधन दरवाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून मुंबईत CNG आणि PNGच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. महानगर गॅस लिमिटेडने (MGL) CNGच्या दरात प्रतिकिलो २ रुपयांची वाढ जाहीर केली असून घरगुती PNGच्या दरात प्रति SCM ५० पैशांची वाढ केली आहे. हे नवे दर मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. दरवाढीनंतर मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशात CNGचा दर ८६ रुपये प्रतिकिलो झाला असून PNGचा दर ५२ रुपये प्रति SCM इतका झाला आहे. गेल्या दोन आठवड्यांतील ही दुसरी दरवाढ असल्याने नागरिक, वाहनचालक आणि गृहिणींच्या खर्चात आणखी वाढ होणार आहे.

यापूर्वी १३ मे रोजीही CNGच्या दरात २ रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे अवघ्या १५ दिवसांत CNG चार रुपयांनी महागला आहे. या सलग दरवाढीचा सर्वाधिक परिणाम रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आधीच्या दरवाढीनंतरच रिक्षा-टॅक्सी संघटनांनी प्रतिकिलोमीटर १ रुपया भाडेवाढ करण्याची मागणी केली होती. आता पुन्हा इंधन महागल्यामुळे भाडेवाढीचा मुद्दा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही मागील काही दिवसांत अनेकदा वाढ झाल्याने महागाईचा भडका उडाला असून सर्वसामान्यांचे आर्थिक गणित विस्कळीत होत आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता असून त्याचा परिणाम विविध वस्तूंच्या किमतींवरही होऊ शकतो.

Previous Post

ईदनिमित्त ‘मैं हूँ…’ गाण्याची खास भेट; सलमान खानचा रोमँटिक अंदाज चर्चेत!

Next Post

मुंबई महापालिकेची डिजिटल झेप; भारतातील पहिली एआय आधारित बांधकाम परवानगी प्रणाली सुरू

Next Post
मुंबई महापालिकेची डिजिटल झेप; भारतातील पहिली एआय आधारित बांधकाम परवानगी प्रणाली सुरू

मुंबई महापालिकेची डिजिटल झेप; भारतातील पहिली एआय आधारित बांधकाम परवानगी प्रणाली सुरू

BreakingNews

स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त ठाणे जिल्हा परिषदेत अभिवादन

दिल्ली मेट्रोला आंदोलनाचा फटका; १६ स्थानके तातडीने बंद!

राज्यातील सर्व शाळांचे सुरक्षा मूल्यांकन अनिवार्य; शिक्षण विभागाचे तातडीचे आदेश!

पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये रिक्षा भाडेवाढीची शक्यता; २३ जुलैच्या बैठकीत होणार महत्त्वाचा निर्णय

मुंबईत २३ व २६ जुलैला ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’

१५ ऑगस्टपासून पिंपरी-चिंचवडमध्ये कचरा विलगीकरण सक्तीचे!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.