Lokrakshanay
Saturday, May 2, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

कल्याण गुन्हे शाखेची कारवाई; डोंबिवलीत कोयता घेऊन फिरणाऱ्या तडीपार गुंडाला अटक

सागर उर्फ डोळा काशिनाथ दाते (२८) असे या गुंडाचे नाव आहे.

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 8, 2024
in गुन्हेगारी, ताज्या बातम्या
कल्याण गुन्हे शाखेची कारवाई; डोंबिवलीत कोयता घेऊन फिरणाऱ्या तडीपार गुंडाला अटक
Share on FacebookShare on Whatsapp

डोंबिवली : येथील पूर्वेतील दत्तनगर उद्यानाजवळ कोयता घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तडीपार गुंडाला कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. डोंबिवली परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्या बद्दल या गुंडाला पोलिसांनी १८ महिन्यांसाठी ठाणे जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. सागर उर्फ डोळा काशिनाथ दाते (२८) असे या गुंडाचे नाव आहे. त्याच्यावर डोंबिवलीतील पोलीस ठाण्यात शस्त्र, धारदार शस्त्रे घेऊन दहशत माजविणे, शांततेचा भंग करणे असे चार गुन्हे दाखल आहेत. तडीपार असताना सागर पुन्हा डोंबिवलीत दिसू लागल्याने शहरातील नागरिक अस्वस्थ होते.

तडीपार सागर दाते डोंबिवलीत धारदार कोयता घेऊन फिरत असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेचे हवालदार दत्ताराम भोसले यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांना दिली. साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले, उपनिरीक्षक संजय माळी, हवालदार दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, गुरूनाथ जरग, विश्वास माने, मिथुन राठोड यांनी दत्तनगर भागात जाऊन सापळा लावला. प्रगती महाविद्यालया समोरील उद्याना जवळून तडीपार सागर दाते हातात कोयता घेऊन दहशत माजवित चालला असल्याचे दिसताच साध्या वेशातील पोलिसांनी त्याला घेरले. त्याने कोयत्याचा धाक दाखवून पोलिसांच्या तावडीतून पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याचा कोयता प्रथम काढून घेतला. त्याला पथकाने घेरून अटक केली. सागरवर संघटित गुन्हेगारी कायद्याने गुन्हे दाखल आहेत. सागरला अटक करून त्याला रामनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या पोलिसांकडून त्याला जिल्ह्याच्या बाहेर सोडण्याची कार्यवाही करण्यात आली.

Previous Post

गुजरात सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले ! बिल्किस प्रकरणातील ११ आरोपींची मुक्तता करण्याचा निर्णय केला रद्द

Next Post

हरमनप्रीत कौरने ट्वेंटी-२० मालिकेतील दुसरा सामन्यातील पराभवाचं खापर फोडलं फलंदाजांवर

Next Post
हरमनप्रीत कौरने ट्वेंटी-२० मालिकेतील दुसरा सामन्यातील पराभवाचं खापर फोडलं फलंदाजांवर

हरमनप्रीत कौरने ट्वेंटी-२० मालिकेतील दुसरा सामन्यातील पराभवाचं खापर फोडलं फलंदाजांवर

BreakingNews

‘राजा शिवाजी’चा बॉक्स ऑफिसवर विक्रमी जलवा; पहिल्याच दिवशी १२.४० कोटींची कमाई

महाराष्ट्र पोलिस दलात मोठ्या पदोन्नती; ३६४ सहाय्यक पोलिस निरीक्षकांना बढतीचा मार्ग मोकळा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू; घरबसल्या करता येणार आरक्षण

महाराष्ट्रात ‘डिजिटल जनगणना २०२७’चा शुभारंभ; राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून स्व-गणना पूर्ण

प्रामाणिकपणा, सेवा आणि समर्पण जपण्याची गरज; पुरस्कार विजेतेच जिवंत आदर्श – राज्यपाल जिष्णू देव वर्मा

HSC निकाल LIVE: दुपारी १ वाजल्यापासून रिझल्ट ऑनलाईन उपलब्ध

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.