Lokrakshanay
Monday, May 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

‘महाराष्ट्र ॲग्री हॅकेथॉन’ची राज्यस्तरीय घोषणा; पहिला पुरस्कार अजित पवारांच्या नावाने!

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 18, 2026
in ताज्या बातम्या, पुणे, महाराष्ट्र
‘महाराष्ट्र ॲग्री हॅकेथॉन’ची राज्यस्तरीय घोषणा; पहिला पुरस्कार अजित पवारांच्या नावाने!
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : कृषी क्षेत्रातील संशोधन, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांना चालना देण्यासाठी पुढील वर्षापासून राज्यस्तरावर ‘महाराष्ट्र ॲग्री हॅकेथॉन’ आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पुणे ॲग्री हॅकेथॉनच्या धर्तीवर ही राज्यव्यापी स्पर्धा होणार असून, स्पर्धेतील प्रथम पुरस्कार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने दिला जाणार आहे. कृषी विभागाच्या वतीने कृषी महाविद्यालयात आयोजित दुसऱ्या ‘पुणे ॲग्री हॅकेथॉन’च्या समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभात मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, खासदार मेधा कुलकर्णी तसेच विविध कृषी विद्यापीठांचे कुलगुरू आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शेती अधिक शाश्वत, तंत्रज्ञानाधारित आणि उत्पादनक्षम करण्यासाठी आधुनिक संशोधन आणि नवकल्पनांची मोठी गरज आहे. कृषी नवसंकल्पना स्पर्धेसारखे उपक्रम भविष्यातील कृषी व्यवस्थेला नवी दिशा देणारे ठरत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी पुणे ॲग्री हॅकेथॉनमधील निवडक १८ नवकल्पनांना पुढील टप्प्यात विशेष मदत आणि मार्गदर्शन दिले जाईल, अशी घोषणा केली. त्यापैकी किमान १२ प्रकल्प प्रत्यक्ष बाजारात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेची सुरुवात झाली आहे. बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे अत्यावश्यक झाले आहे. या स्पर्धेमुळे तरुण संशोधक, विद्यार्थी आणि स्टार्टअप्सना शेतीसाठी नवे तंत्रज्ञान विकसित करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारच्या या उपक्रमामुळे कृषी क्षेत्रातील नवकल्पनांना चालना मिळून शेतकऱ्यांसाठी आधुनिक आणि परिणामकारक उपाययोजना विकसित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

स्पर्धेतील विभागांनुसार विजेते

  • मृदा आरोग्य व व्यवस्थापन
    विजेता : किसान साथी
    उपविजेता : नॅनो वीटा
  • स्मार्ट जल व्यवस्थापन व स्वयंचलन
    विजेता : आयओएच अभियंता समूह
    उपविजेता : फार मोअर
  • कृषी यांत्रिकीकरण (कृत्रिम बुद्धिमत्ता व यंत्रमानव तंत्रज्ञान)
    विजेता : एग्रीटेक नेक्सस
    उपविजेता : टीम व्हीएनएमकेव्ही
  • कृषी प्रक्रिया व मूल्य साखळी
    विजेता : विन विन बाईट्स
    उपविजेता : सिल्कस्कॅन इनोव्हेटर्स
  • अक्षय ऊर्जा व कृषी कचरा व्यवस्थापन
    विजेता : प्रोटो फीड्स
    उपविजेता : इको एक्सट्रॅक्ट
  • पीक संरक्षण व कीड व्यवस्थापन
    विजेता : स्मार्ट बायो डिलिव्हरी
    उपविजेता : कृषी नेत्र
  • हवामान अनुकूल व डिजिटल शेती
    विजेता : डीप अँग बॉट
    उपविजेता : मॉडर्न व्हिलेज फ्यूचर इनोव्हेशन्स
  • भूस्थानिक व भौगोलिक माहिती प्रणाली आधारित पीक सर्वेक्षण व्यवस्था
    विजेता : क्रॉप जेन एआय
    उपविजेता : ग्रीन माइंड्स
  • स्मार्ट कृषी प्रशासनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
    विजेता : ई-पिक ऑडिट एआय
    उपविजेता : कृषी प्रबंध

 

Previous Post

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

Next Post

ठाणे जिल्ह्यात युरिया खताचा काळाबाजार रोखण्यासाठी उभारणार चेकनाके

Next Post
ठाणे जिल्ह्यात युरिया खताचा काळाबाजार रोखण्यासाठी उभारणार चेकनाके

ठाणे जिल्ह्यात युरिया खताचा काळाबाजार रोखण्यासाठी उभारणार चेकनाके

BreakingNews

ठाणे जिल्ह्यात युरिया खताचा काळाबाजार रोखण्यासाठी उभारणार चेकनाके

‘महाराष्ट्र ॲग्री हॅकेथॉन’ची राज्यस्तरीय घोषणा; पहिला पुरस्कार अजित पवारांच्या नावाने!

हिंदी मालिकेतून वर्षा उसगांवकर यांचे दमदार पुनरागमन!

कर्ज, कौशल्य विकास आणि रोजगार योजनांमुळे आदिवासी लाभार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल – मंत्री डॉ. अशोक वुईके

जनगणनेमुळे शिक्षक प्रशिक्षण पुढे ढकलले; राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीतून वाहतूक कोंडीला पर्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.