Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रवीण तरडे यांच्या आगामी सिनेमात ‘नास्तिक आणि स्वामी’ यांच्यातील संघर्ष

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
May 7, 2026
in ताज्या बातम्या, मनोरंजन
‘देऊळबंद २’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; स्वामीभक्तांकडून सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिसाद
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरडे यांच्या आगामी बहुचर्चित चित्रपट देऊळबंद २ चा अधिकृत ट्रेलर अखेर प्रदर्शित करण्यात आला असून, सोशल मीडियावर त्याला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत आहे. गुरुवारी दुपारी १ वाजता ट्रेलर रिलीज करण्यात आला आणि काही तासांतच चाहत्यांनी त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव केला. प्रवीण तरडे यांच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर हा ट्रेलर पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आला असून, अवघ्या दोन तासांत जवळपास १८ हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, ट्रेलरखाली स्वामीभक्तांनी “श्री स्वामी समर्थ”च्या जयघोषासह भावनिक प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. या चित्रपटात पुन्हा एकदा स्वामींची भूमिका मनोहर जोशी यांनी साकारली असून, ‘नास्तिक आणि स्वामी’ या संकल्पनेवर आधारित भक्ती आणि श्रद्धेचा संघर्ष मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.

प्रदर्शित ट्रेलरमध्ये एका नास्तिक महिलेची कथा दाखवण्यात आली आहे, जी तिच्या आस्तिक नवऱ्यासोबत सततच्या वादांमुळे त्रस्त झालेली असते. एका प्रसंगात तिचा नवरा रागाच्या भरात स्वामींचे देऊळ बंद करून निघून जातो. त्यानंतर ती महिला संतापाच्या भरात वटवृक्षाखाली जाऊन स्वामींना आव्हान देते आणि त्याच वेळी स्वामी तिच्यासमोर प्रकट होतात. ट्रेलरमधील स्वामी आणि त्या महिलेतील संवाद विशेष लक्षवेधी ठरत आहेत. “प्रत्येक युगात मी तुझ्यासारखे कित्येक रावण आणि दुर्योधन पाहिले,” असा स्वामींचा संवाद तर “तुम्ही कधी शेतकरी पाहिलाय का?” असा महिलेचा सवाल प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. ट्रेलरच्या शेवटी “परीक्षा घेतली आहेस ना, आता उत्तर दिल्याशिवाय मी जाणार नाही,” हा संवाद चित्रपटातील गूढ आणि आध्यात्मिक संघर्ष अधिक गडद करतो. चित्रपटात महेश मांजरेकर, ओम भुतकर आणि मंगेश देसाई यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तसेच ट्रेलरमध्ये श्रीकृष्णाचे दर्शन घडत असल्याने चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

Previous Post

ठाण्यात ३०० हून अधिक रस्ते कर्मचाऱ्यांना CPR आणि प्राथमिक उपचारांचे प्रशिक्षण

Next Post

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

Next Post
‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

‘सरके चुनार’ वाद प्रकरणी नोरा फतेहीची महिला आयोगाकडे माफी; १०० अनाथ मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेणार

BreakingNews

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णधडाका; महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने चीनला हरवत पटकावले सातवे सुवर्ण

दुष्काळावर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ६,७२८ कोटींचा निधी; मंत्री भरत गोगावले यांची माहिती

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.