Lokrakshanay
Thursday, April 16, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा त्र्यंबकेश्वर आणि चोंडीतून शुभारंभ; अहिल्यादेवींच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भव्य आयोजन

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
April 14, 2026
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा त्र्यंबकेश्वर आणि चोंडीतून शुभारंभ; अहिल्यादेवींच्या ३०० व्या जयंतीनिमित्त भव्य आयोजन
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : “गोदा ते नर्मदा” या पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६ चा शुभारंभ त्र्यंबकेश्वर आणि चोंडी येथून कार्यक्रमाद्वारे केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.    अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त त्यांचे कार्य, विचार व वारसा नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी २५ ते २९ एप्रिल २०२६ या कालावधीत या जलयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. गोदा ते नर्मदा या जलयात्रेबाबत मंत्रालयात सादरीकरण करण्यात आले. यावेळी  मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा ( विदर्भ, तापी,कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्रा , जलसंपदा लाभक्षेत्र विकास सचिव संजय बेलसरे, जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, अहिल्यादेवींची जन्मभूमी चोंडी महाराष्ट्रात असून त्यांचा प्रभावी सांस्कृतिक वारसा महाराष्ट्राशी जोडलेला आहे. अहिल्यादेवींच्या कार्यातील सुशासन, महिला नेतृत्व, लोककल्याण, जलदृष्टी , वारसा संवर्धन यासाठी राष्ट्रीय मूल्ये महत्त्वपूर्ण आहे. राज्य शासनाकडून त्याचे स्मरण करताना हा उपक्रम या जलयात्रेच्या निमित्ताने राबविला जाणार आहे. २५ एप्रिल २०२६ रोजी अहिल्यादेवींचे जन्मगाव चोंडी आणि नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथून यात्रांचा शुभारंभ होईल आणि या यात्रांचा संगम शिर्डी येथे होणार असून तेथून छत्रपती संभाजी नगर घृष्णेश्वर, धुळे या मार्गाने इंदूर येथे २९ एप्रिल रोजी समारोप होईल. या जलयात्रेदरम्यान विविध कार्यक्रम व उपक्रम जलयात्रेच्या मार्गावरील गावांमध्ये आणि शहरात होणार आहेत. लघु कालव्यांचे जाळे उभारणे, पाणी साठवण आणि जलसंवर्धन, शेतीपूरक विकास, स्थानिक रोजगार आणि कुटीर उद्योगांना चालना हे अहिल्यादेवींचे जलसंवर्धनातील कार्य प्रेरणास्त्रोत आहे. अहिल्यादेवींनी हे तत्त्व २५०-३०० वर्षांपूर्वी आचरणात आणले होते. अहिल्यादेवींनी गरीब, वंचित, शेतकरी आणि सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून शासन केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव केला असून या कालावधीत विविध उपक्रम देशभरात आयोजित करण्यात आले आहेत.

  • स्मारक नाणे व टपाल तिकीट प्रकाशन
  • महिला सक्षमीकरण, सुशासन व वारसा संवर्धनाशी निगडित उपक्रम
  • प्रदर्शने, प्रकाशने, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम.
  • विविध राज्ये, संस्था यांच्यावतीने विविध कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावर आयोजन केले गेले आहे.
Previous Post

बाबासाहेब म्हणजे दूरदृष्टी असणारा आदर्श नेता

Next Post

सावधान! कल्याणात ८२ वर्षीय आजींना ‘डिजिटल अटक’ची भीती दाखवून ७३ लाखांचा गंडा

Next Post
सावधान! कल्याणात ८२ वर्षीय आजींना ‘डिजिटल अटक’ची भीती दाखवून ७३ लाखांचा गंडा

सावधान! कल्याणात ८२ वर्षीय आजींना ‘डिजिटल अटक’ची भीती दाखवून ७३ लाखांचा गंडा

BreakingNews

जय शिवराय! अजय-अतुलच्या मंत्रमुग्ध सुरांनी घुमला शिवकाल; ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित!

उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज; १५ जिल्ह्यांसाठी ‘तीन’ विशेष SOP जारी

CBSE १०-१२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! अधिकृत वेबसाईटसह ‘DigiLocker’ वरही निकाल पाहण्याची सुविधा

ठाण्यात १५ एप्रिल रोजी तृतीयपंथीयांसाठी विशेष विभागीय कार्यशाळा; हक्क, मार्गदर्शन आणि तक्रार निवारणावर भर

महाराष्ट्र दिनापासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमभंग केल्यास परवाना रद्द होणार

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ठाण्यात भव्य अभिवादन कार्यक्रम

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.