Lokrakshanay
Thursday, June 18, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

भारताने मत्स्यव्यवसायात गाठला ऐतिहासिक टप्पा! १० वर्षांत उत्पादन १९.७ दशलक्ष टन वाढ

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
February 11, 2026
in ताज्या बातम्या, देश -विदेश
भारताने मत्स्यव्यवसायात गाठला  ऐतिहासिक टप्पा! १० वर्षांत उत्पादन १९.७ दशलक्ष टन वाढ
Share on FacebookShare on Whatsapp

नवी दिल्ली : भारताच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्राने गेल्या दशकात लक्षणीय यश मिळवलंय. देशातील मत्स्य उत्पादन २०१३-१४ मध्ये ९.५७९ दशलक्ष टनांवरून २०२४-२५ मध्ये १९.७ दशलक्ष टन इतकं वाढलंय. या काळात सरकारने आर्थिक मदत आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर दिलाय. मत्स्यव्यवसाय क्षेत्रासाठी विविध योजनांअंतर्गत आतापर्यंत १३ हजार कोटींहून अधिक किमतीचे कर्ज मंजूर करण्यात आलंय. जून २०२५ पर्यंत ४.७६ लाख किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) जारी करण्यात आलेत, ज्यातून ३२१४.३२ कोटी रुपये वितरित करण्यात आलेत, अशी माहिती सरकारनं दिलीय.

मत्स्यव्यवसायासाठी किसान क्रेडिट कार्ड योजना २०१८-१९ मध्ये सुरू करण्यात आली. ही योजना अल्पकालीन कर्जाचा एक प्रमुख स्रोत आहे. या योजनेअंतर्गत ७ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध आहे, जे वेळेवर परतफेड केल्यास 4 टक्क्यां पर्यंत कमी होते. मत्स्यपालन आणि मत्स्यपालन पायाभूत सुविधा विकास निधी (FAIDF) अंतर्गत जुलै २०२५ पर्यंत १७८ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलीय. या प्रकल्पांसाठी ६३६९ कोटींपेक्षा जास्त किमतीचे कर्ज मंजूर करण्यात आलंय. या निधीचा एकूण आकार ७५२२.४८ कोटी आहे आणि त्याची मुदत मार्च २०२६ पर्यंत वाढविण्यात आलीय. तो ३ टक्के व्याज अनुदान देखील देतो. बँकांना कर्ज देण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ७५० कोटींचा क्रेडिट गॅरंटी फंड तयार करण्यात आलाय, ज्याचे व्यवस्थापन NABSanrakshan द्वारे केले जाते. या निधीमध्ये १२.५ कोटींपर्यंतच्या असुरक्षित कर्जांचा समावेश आहे. १२ राष्ट्रीयीकृत बँकांना राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय डिजिटल प्लॅटफॉर्मशी एकत्रित करण्यात आलंय. या प्लॅटफॉर्मद्वारे आतापर्यंत हजारो कर्ज अर्जांवर प्रक्रिया करण्यात आलीय. या प्लॅटफॉर्मवर १९ हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी अर्ज केलेत, त्यापैकी ३५० जणांना मंजुरी देण्यात आली आहे. कर्जाची रक्कम १५ हजार ते ५ कोटी रुपयांपर्यंत आहे.

Previous Post

Snapchat ला टक्कर देण्यासाठी लवकरच येणार Meta चं नवं ‘Instants’ अ‍ॅप!

Next Post

अखेर भारतासमोर झुकला पाकिस्तान! १५ फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान कोलंबोत महासामना

Next Post
अखेर भारतासमोर झुकला पाकिस्तान! १५ फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान कोलंबोत महासामना

अखेर भारतासमोर झुकला पाकिस्तान! १५ फेब्रुवारीला भारत-पाकिस्तान कोलंबोत महासामना

BreakingNews

जी-७ परिषदेत मोदी-ट्रम्प भेट; भारताच्या सुरक्षेसाठी अमेरिकेच्या पाठिंब्याची ग्वाही!

साकीनाक्यात एफडीएची धडक कारवाई; २,५१० लिटर संशयित चिली व सोया सॉस जप्त!

व्हॉट्सअ‍ॅप वेबवर लवकरच येणार ग्रुप कॉलिंग फीचर; ३२ जणांना एकत्र जोडता येणार!

खाद्यपदार्थांच्या प्लास्टिक वेष्टनांवर बंदीची मागणी; महापालिकेची जबाबदारी राज्य सरकारकडे!

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज!

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; लाभार्थी महिलांना दिलासा!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.