ठाणे : जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत अधिकारी-कर्मचारी यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता. दि. ०६ फेब्रुवारी, २०२६ रोजी ‘सप्तरंग महोत्सव २०२६’ सांस्कृतिक कार्यक्रम गडकरी रंगायतन, तलावपाळी येथे संपन्न झाला. कार्यक्रमांचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक रणजित यादव याच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी GPF ॲप अनावरण करण्यात आले. कलेला वाव मिळण्यासाठी जिल्हा परिषद आयोजित ‘सप्तरंग महोत्सव २०२६’ कार्यक्रम अधिकारी-कर्मचारी यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी हा मंच महत्वाचा असून सर्वांनी आनंदाने सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी केले. कलेच्या माध्यमातून अधिकारी कर्मचाऱ्यांमधील धुरंधर कलाकारांचे दर्शन यानिमित्ताने होईल. कार्यक्रमासाठी सामान्य प्रशासन विभागाने पुढाकार घेऊन उत्तम कामगिरी केल्याबद्दल उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे व सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी अभिनंदन केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सप्तरंग महोत्सव २०२६ या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे. आपल्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी हा मंच आहे.
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग प्रमोद काळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे, शिक्षणाधिकारी माध्यमिक देविदास महाजन, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. वल्लभ जोशी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास विभाग संजय बागुल, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग पद्माकर लहाने, कृषी विकास अधिकारी एम. एम. बाचोटीकर, प्रकल्प संचालक जलजीवन मिशन पंडीत राठोड, उप अभियंता (यांत्रिकी) संजय सुकटे, समाजकल्याण अधिकारी उज्वला सकपाळे, गट विकास अधिकारी (मग्रारोहयो) प्राची साळसकर, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी अंजली अंबेकर, जनसंपर्क अधिकारी रेश्मा आरोटे, सर्व तालुकास्तरीय गट विकास अधिकारी, विभाग प्रमुख तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दररोजच्या कामातून अधिकारी व कर्मचारी यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे कलाकार गायक सारेगमप मराठी विजेता अभिजीत कोसंबी यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून त्यांच्या अप्रतिम गाण्याने वातावरण प्रसन्न झाले. या ‘सप्तरंग महोत्सव २०२६’ कार्यक्रमांत गायन, नृत्य, फॅन्सी ड्रेस, एकपात्री नाटक, सामुहिक नाटक, वेशभूषा इत्यादी कला गुण यांचे अधिकारी व कर्मचारी याच्याकडून सादरीकरण करण्यात आले.

