ठाणे : कल्याण डोंबिवली नंतर बदलापूरमध्ये देखील नगरपालिका प्रशासनानं अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत ४०० हून अधिक अनधिकृत बांधकामांवर हातोडा मारण्यात आला. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर छोट्या व्यवसायिकांचे नुकसान झाले असून नागरिकांनी पालिकेच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. दि. २ फेब्रुवारी रोजी बदलापूर नगरपालिका प्रशासनानं अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. या बांधकामांबाबत अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयानं पालिकेला आदेश दिले होते. त्यानुसार नगरपालिकेनं शहरातील ४०० हून अधिक अनाधिकृत बांधकामांची यादी तयार करण्यात आली. पालिकेमार्फत अंबरनाथ-बदलापूर हायवे तसेच पनवेल हायवे लगतची अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली आहे. पुढील आठ ते दहा दिवस ही कारवाई सुरू राहणार असून शहरातील ४०० हून अधिक अनधिकृत बांधकामं हटवण्यात येतील अशी माहिती पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली आहे. गेल्या काही वर्षात बदलापूर शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत. यात व्यावसायिक दुकानांचं प्रमाण सर्वाधिक आहे. दरम्यान बदलापूर मधल्या नागरिकांनी या कारवाईचं स्वागत केल आहे

