Lokrakshanay
Friday, April 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home गुन्हेगारी

नालासोपाऱ्यात बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाचा पर्दाफाश; तीन डॉक्टरांवर गुन्हा दाखल

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 27, 2026
in गुन्हेगारी, महाराष्ट्र
नालासोपाऱ्यात बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाचा पर्दाफाश; तीन डॉक्टरांवर गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Whatsapp

विरार : नालासोपारा पूर्वेतील आचोळे परिसरात असलेल्या ‘केअर अँड क्युअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल‌’ मध्ये बेकायदेशीररित्या गर्भपात केला जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने स्टिंग ऑपरेशन करून या प्रकरणाचा पर्दाफाश केला असून, याप्रकरणी तीन डॉक्टरांविरोधात आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नालासोपारा पूर्वेतील आचोळे येथे केअर अँड क्युअर मल्टीस्पेशालिटी नावाचे रुग्णालय आहे. या रुग्णालयात कोणतीही वैध परवानगी नसताना गर्भपात केला जात असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला प्राप्त झाली होती. या माहितीची गंभीर दखल घेत वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पांढरे आणि डॉ. कृष्णा गोसावी यांना रुग्णालयाची तपासणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार २२ जानेवारी रोजी संबंधित अधिकाऱ्यांनी स्टिंग ऑपरेशन करत केअर अँड क्युअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची प्रत्यक्ष तपासणी केली. तपासणीत रुग्णालयात कोणतीही अधिकृत परवानगी नसताना गर्भपाताच्या गोळ्या रुग्णांना दिल्या जात असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे संबंधित व्यक्तींना गर्भपात करण्याचा वैधानिक अधिकार नसतानाच आवश्यक शैक्षणिक अर्हताही नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात रुग्णालयाचा संचालक डॉ. चंद्रकांत शंभुनाथ मिश्रा व अरुण शुक्ला, तसेच संतोष भवन, वालईपाडा येथील कुशल क्लिनिकचा डॉ. संजीव सिंग हा दोषी आढळून आले आहेत. त्यानुसार वसई-विरार महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संबंधितांविरोधात आचोळे पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

“बाबासाहेबांचं नाव भाषणात का नाही घेतलं?” – वन अधिकारी जाधव यांचा गिरीश महाजनांच्या भाषणावर आक्षेप

Next Post

३० जानेवारी २०२६ – हुतात्मा दिन

Next Post
३० जानेवारी २०२६ – हुतात्मा दिन

३० जानेवारी २०२६ - हुतात्मा दिन

BreakingNews

धाराशिवमध्ये भीमगीतांचा जल्लोष; आदर्श शिंदे यांच्या कार्यक्रमाने निर्माण केला प्रेरणेचा माहोल

परिचारिका होण्याचे स्वप्न आता सुकर! वांद्र्यात मुंबई महापालिका उभारणार ‘नर्सिंग कॉलेज’

नागपूरमध्ये उष्णतेचा कहर! १८ एप्रिलला सर्व शाळा बंद

ठाणे-शिंदी एसटी प्रवासाची चिंता मिटली! रात्रीची बस आणि परतीची सोय पुन्हा सुरू

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा इशारा! २१ एप्रिलपासून सरकारविरोधात बेमुदत संपाची हाक

पालकांची लूट थांबणार! शाळांच्या गणवेश आणि शैक्षणिक साहित्य सक्तीला चाप

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.