Lokrakshanay
Friday, July 17, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २७ जानेवारीपासून १० टक्के पाणीकपात

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
January 24, 2026
in ताज्या बातम्या, मुंबई
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २७ जानेवारीपासून १० टक्के पाणीकपात
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टिम’च्या वार्षिक परिरक्षणाचे काम २७ जानेवारी ते ७ फेब्रुवारी दरम्यान हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे मुंबई शहर आणि पूर्व उपनगरांतील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मुंबई शहर आणि पूर्व उपनगरांमध्ये २७ जानेवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाने घेतला आहे. त्याचचरोबर महापालिकेतर्फे पाणीपुरवठा करण्यात येत असलेल्या ठाणे आणि भिवंडी महानगरपालिकेच्या हद्दीतील विभागांमध्ये १० टक्के पाणीकपात लागू राहणार आहे. या कालावधीत मुंबईकरांना त्रास सहन करावा लागणार आहे. विशेषतः पूर्व उपनगरात आधीच पाण्याची समस्या असताना या दुहेरी समस्याचा सामना करावा लागणार आहे.

शहरातील ‘ए’ विभागातील नेव्हल डॉकयार्ड क्षेत्र, ‘बी’ विभागातील संपूर्ण परिसर, ‘सी’ विभागातील भेंडी बाजार, बोहरी मोहल्ला, घोगरी मोहल्ला परिसर, ‘ई’ विभागातील संपूर्ण परिसर, ‘एफ दक्षिण’ विभागातील संपूर्ण परिसर, ‘एफ उत्तर’ विभागातील संपूर्ण परिसर, पूर्व उपनगरांतील ‘टी’ विभागातील मुलुंड (पूर्व) आणि (पश्चिम) परिसर, ‘एस’ विभागातील भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी (पूर्व) परिसर, ‘एन’ विभागातील विक्रोळी, घाटकोपर (पूर्व), घाटकोपर परिसर, ‘एल’ विभागातील कुर्ला (पूर्व), ‘एम पूर्व मधील संपूर्ण विभाग, ‘एम पश्चिम’मधील संपूर्ण विभागात १० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेला पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टिम’च्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येतो. या ‘न्यूमॅटिक गेट सिस्टिम’च्या वार्षिक परिरक्षणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम २७ जानेवारी ते ७ पेब्रुवारी दरम्यान करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि पूर्व उपनगरांमधील महापालिकेच्या बहुतांश प्रशासकीय विभागांतील पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे. या कालावधीत मुंबई शहर विभाग आणि पूर्व उपनगरांमध्ये १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. ठाणे आणि भिवंडी महानगरपालिकेच्या हद्दीतील काही भागांमध्ये ही १० टक्के पाणीकपात लागू राहणार आहे. सर्व संबंधित परिसरांमधील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून या कालावधीत पाणी काटकसरीने वापरावे. तसेच, महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Previous Post

वाढत्या प्रदूषणामुळे बीएमसी आयुक्तांच्या पगारावर टांगती तलवार! – उच्च न्यायालयाचे आदेश

Next Post

मुलांच्या सुरक्षेसाठी अनधिकृत स्कुल व्हॅन टाळा! बदलापूर घटनेनंतर परिवहन विभागाचे पालकांना आवाहन

Next Post
मुलांच्या सुरक्षेसाठी अनधिकृत स्कुल व्हॅन टाळा! बदलापूर घटनेनंतर परिवहन विभागाचे पालकांना आवाहन

मुलांच्या सुरक्षेसाठी अनधिकृत स्कुल व्हॅन टाळा! बदलापूर घटनेनंतर परिवहन विभागाचे पालकांना आवाहन

BreakingNews

अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधत मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर

डिजिटल व्यवस्थेचा ज्येष्ठ नागरिकांना फटका; बोटांचे ठसे न जुळल्याने एसटीच्या सवलतीला मुकण्याची वेळ!

विनातिकीट फिरणाऱ्यांना १६ कोटींचा फटका! मध्य रेल्वेने ४० दिवसांत पकडले २ लाख प्रवासी

मलबार हिल निसर्ग उन्नत मार्ग ऑगस्टअखेरपर्यंत पर्यटकांसाठी बंद!

डॉ. निलेश साबळेची नव्या शोची चाहूल; ‘काहीतरी मॅड येतंय लवकरच’ पोस्टने चाहत्यांमध्ये उत्सुकता

पारशी डेअरीवर FDA ची मोठी पकड! दूध भेसळप्रकरणी परवाना निलंबित, दोघांना बेड्या

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.