वृत्तसंस्था : Apple pay यावर्षी Gpay आणि फोनपे सारख्या पेमेंट अॅप्सशी स्पर्धा करण्यासाठी भारतात येऊ शकते. रिपोर्टनुसार, Apple या वर्षाच्या अखेरीस भारतात ही सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. मात्र, त्यासाठी नियामकाची मान्यता घेणे आवश्यक असेल.
सध्या Apple pay ची ही सेवा जगभरातील ८९ देशांमध्ये उपलब्ध आहे आणि आता Apple ही सेवा भारतातही आणणार आहे. गेल्या काही वर्षांत Apple ने भारतीय बाजारपेठेत आपले स्थान मजबूत केले आहे. अशा परिस्थितीत Apple च्या इकोसिस्टम फीचर्सची भारतात लाँचिंग कंपनीसाठी फायदेशीर ठरू शकते. IDC च्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर २०२५ च्या तिमाहीत कंपनीने देशात ५० लाख युनिट्सची आतापर्यंतची सर्वाधिक विक्री नोंदवली. Apple pay च्या माध्यमातून Apple भारतात आपले प्रसिद्ध ‘टॅप-टू-पे’ फीचर सादर करणार आहे. या मदतीने, युजर्स पेमेंट मशीनवर फक्त त्यांचा आयफोन टॅप करून सहजपणे देय देण्यास सक्षम आहेत. यासाठी पिन घालण्याची गरज नाही. यासाठी NFC चा वापर केला जातो. यासाठी, युजर्स त्यांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डची माहिती अॅपल वॉलेटमध्ये संग्रहित करू शकतात आणि कार्ड स्वाइपशिवाय सहजपणे पैसे देऊ शकतात. आतापर्यंत हे फीचर भारतीय युजर्ससाठी उपलब्ध नव्हते. Apple pay फक्त Apple च्या आयफोन, अॅपल वॉच सारख्या प्रोडक्ट्समध्ये काम करते. कंपनीला आशा आहे की, या फीचरमुळे युजर्सचे अॅपलसोबतचे नाते आणखी दृढ होईल.

