वृत्तसंस्था : साधारणपणे एखादा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला की, त्यातील कलाकार लगेचच लोकांचे आवडते बनतात. सोशल मीडियावर त्यांच्या फोटो-व्हिडिओंचा जणू पूर येतो, सतत सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावणे आणि एकामागोमाग एक मुलाखती सुरू होतात. मात्र, ‘धुरंधर’च्या यशानंतरही रणवीर सिंहने वेगळा मार्ग निवडला आहे. प्रत्येक कार्यक्रमात उत्साही दिसणारा रणवीर सध्या चर्चेपासून दूर आहे. त्याच्या कोणत्याही मुलाखती नाहीत, आनंद व्यक्त करणाऱ्या पोस्ट नाहीत आणि सार्वजनिक कार्यक्रमांत फारशी उपस्थितीही दिसत नाही.
२०१९ मध्ये आलेल्या ‘गली बॉय’ या चित्रपटानंतर रणवीर सिंहला बराच काळ बॉक्स ऑफिसवर असं यश मिळाले नव्हतं. ‘८३’ या चित्रपटाला समीक्षकांकडून चांगली दाद मिळाली; मात्र कोविडमुळे तो व्यावसायिकदृष्ट्या अपयशी ठरला. ‘जयेशभाई जोरदार’ आणि ‘सर्कस’ या चित्रपटांनाही खास प्रतिसाद मिळाला नाही. या काळात करण जोहर दिग्दर्शित ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ याच एकमेव चित्रपटाला समीक्षकांची पसंती मिळाली आणि बॉक्स ऑफिसवरही यश मिळालं. वीरेंद्र रणवीरबद्दल म्हणाले, “रणवीरनं मला सांगितलं की, त्यानं या भूमिकेसाठी १५ किलो वजन घटवलं आणि खरं सागायचं तर, जेव्हा मी थिएटरमधून बाहेर पडलो तेव्हा मला त्यानं किती मेहनत घेतली याची जाणीव झाली. मी त्याला मेसेज करून सांगितलं की, मला चित्रपट खूप आवडला आणि तेव्हासुद्धा त्याचा असाच रिपलाय होता की, मी खूप मेहनत घेतली आहे.”

