Lokrakshanay
Friday, April 24, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

पिंपरी-चिंचवड प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर; एकाच दिवसात ४८१९ अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 17, 2025
in ताज्या बातम्या, पुणे
पिंपरी-चिंचवड प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर; एकाच दिवसात ४८१९ अनधिकृत फ्लेक्सवर कारवाई
Share on FacebookShare on Whatsapp

पुणे : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होताच पिंपरी-चिंचवड शहरात आदर्श आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. आचारसंहितेचे उल्लंघन टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली असून, मंगळवारी (दि.१६) दुपारी तीन वाजेपर्यंत शहरभरातील तब्बल ४ हजार ८१९ अनधिकृत राजकीय फ्लेक्स, बॅनर्स आणि फलकांवर कारवाई करण्यात आली.

राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर रोजी निवडणुकीची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर तात्काळ लागू झालेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने ही धडक कारवाई सुरू केली आहे. शहरातील प्रमुख चौक, मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि शासकीय इमारतींच्या परिसराचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. यामध्ये केवळ फ्लेक्सच नव्हे, तर राजकीय किऑस्क, स्टिकर्स, होर्डिंग, पक्षांचे ध्वज, भिंतींवरील जाहिराती आणि फलक हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी राजकीय पक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच, भविष्यात आचारसंहितेचा भंग होईल असे कोणतेही साहित्य लावू नये, असा इशाराही देण्यात आला आहे.

Previous Post

“आनंद दिघेंच्या फोटोवर टीका करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही” – एकनाथ शिंदे

Next Post

रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण

Next Post
रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण

रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण

BreakingNews

BESTची डिजिटल झेप; Google Pay, PhonePe सह २८ ॲप्सवरून तिकीट खरेदीची सुविधा

ठाणे पोलिसांचा ‘खाकी’ला शिस्तीचा डोस; विनाहेल्मेट दुचाकी चालवणे पोलिसांना पडणार महागात

१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य; निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा

पनवेलच्या खाडीशेजारी बांधणार ‘खारघर कोस्टल रोड’, ४५ मिनिटांचा प्रवास १० मिनिटांत

फॉरेन्सिक ऑडिटमध्ये २० कोटींचा घोटाळा उघड; वरिष्ठ अधिकारी गोत्यात

कळंबोलीतील कॉन्सर्टला सिडकोची ‘नकारघंटा; स्थानिकांच्या विरोधामुळे प्रशासन नमले

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.