Lokrakshanay
Saturday, June 27, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

दणक्यात कमबॅक! निलेश साबळे–भाऊ कदम पुन्हा ‘झी मराठीवर’

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
December 15, 2025
in ताज्या बातम्या, मनोरंजन
दणक्यात कमबॅक! निलेश साबळे–भाऊ कदम पुन्हा ‘झी मराठीवर’
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेला आणि प्रेक्षकांच्या मनावर गेल्या दशकभर अधिराज्य गाजवणारा लोकप्रिय विनोदी कार्यक्रम म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. या कार्यक्रमानं केवळ हास्यनिर्मितीच केली नाही, तर अनेक कलाकारांना घराघरांत पोहोचवलं. तब्बल दहा वर्ष प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केल्यानंतर २०२४ मध्ये या कार्यक्रमानं अधिकृतपणे प्रेक्षकांचा निरोप घेतला. या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली होती.

‘चला हवा येऊ द्या’नंतर काही काळातच या मराठमोळ्या कार्यक्रमाचं नवं पर्व झी मराठीवर सुरू करण्यात आलं. नव्या पर्वात कार्यक्रमाचा ढाचा, मांडणी आणि कलाकारांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले. मात्र, या बदलांपैकी सर्वांत जास्त चर्चेत राहिला तो म्हणजे, कार्यक्रमाचा कणा मानली जाणारी निलेश साबळे आणि भाऊ कदम यांची अनुपस्थिती. ही लोकप्रिय जोडी नव्या पर्वात दिसणार नाही, हे स्पष्ट होताच अनेक प्रेक्षकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली होती. निलेश साबळे आणि भाऊ कदम यांनी ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यांच्या संवादशैली, विनोदाची अचूक टायमिंग आणि सहज अभिनयामुळे ही जोडी महाराष्ट्रातील प्रत्येक घरात पोहोचली. त्यामुळेच त्यांच्या अनुपस्थितीमुळे कार्यक्रमाचा रंग फिकट पडल्याचं मत अनेक प्रेक्षकांनी व्यक्त केलं. दरम्यान, आता या सगळ्या चर्चांवर विराम देणारी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. निलेश साबळे आणि भाऊ कदम पुन्हा एकदा झी मराठीवर झळकण्यासाठी सज्ज झाले असून, दोघांचंही लवकरच दणक्यात पुनरागमन होणार आहे. मात्र, हे कमबॅक ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमातून न होता, एका पूर्णपणे नव्या शोमधून होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Previous Post

नोटबंदीच्या ९ वर्षांनंतर दिल्लीत ३.६० कोटींच्या जुन्या नोटा जप्त

Next Post

“आनंद दिघेंच्या फोटोवर टीका करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही” – एकनाथ शिंदे

Next Post
“आनंद दिघेंच्या फोटोवर टीका करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही” – एकनाथ शिंदे

“आनंद दिघेंच्या फोटोवर टीका करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही” - एकनाथ शिंदे

BreakingNews

१ जुलैपासून पासपोर्ट महागणार; १४ वर्षांनंतर शुल्कात मोठी वाढ!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण मोठ्या पडद्यावर; ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ची घोषणा!

मलंगगडाचा कायापालट! ३५०० पायऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ५ कोटींचा निधी

महिला सुरक्षेसाठी ‘खाकीतील सखी’ उपक्रमाला बळ; ठाणे स्थानकात जनजागृती मोहीम!

खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांसाठी ‘सर्वंकष अन्न सुरक्षा अनुपालन आदेश’; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश

उपांत्य फेरीच्या आशा कायम ठेवण्यासाठी भारतासमोर आज ‘करा किंवा मरा’चा सामना!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.