Lokrakshanay
Thursday, April 30, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home मनोरंजन

बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच ८९व्या वर्षी निधन

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 24, 2025
in मनोरंजन
बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच ८९व्या वर्षी निधन
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : बॉलिवूडचे ‘हिमॅन’ धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८९ वर्षांचे होते. प्रकृतीच्या कारणास्तव मागील अनेक दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. यानंतर घरीच त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र अचानक आज सकाळी एक रुग्णवाहिका धर्मेंद्र यांच्या घरातून बाहेर पडल्यानंतर चर्चांना उधाण आलं. विलेपार्ले येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मोठा मुलगा सनी देओलने मुखाग्नी दिला.

धर्मेंद्र यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात अनेक दिवसांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते. धर्मेंद्र यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना त्यांच्या देखरेखीखाली ठेवलं होतं. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. घरीच त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलेलं. धर्मेंद्र यांनी सहा दशकांहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये काम करत एक मोठा वारसा मागे सोडला आहे. ‘इक्किस’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. २५ डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी हेमा मालिनी आणि सहा मुलं आहेत. सनी देओल, बॉबी देओल, ईशा देओल, अहाना देओल, अजिता आणि विजेता अशी त्यांना सहा मुलं आहेत. धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमध्ये झाला. त्यांचे पूर्ण नाव धरम सिंह देओल आहे. चाहते त्यांना प्रेमाने गरम-धरम म्हणतात. धर्मेंद्र यांनी १९६० मध्ये “दिल भी तेरा हम भी तेरे” या चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांची रेस्तराँ चैन आहे. शाहरुख खान, सलमान खान, अमिषा पटेल आणि गोविंदा यांच्यासह अनेक कलाकार त्यांना भेटण्यासाठी रुग्णालयात पोहोचले होते.

Previous Post

मराठी माणसांसाठी येणारी निवडणूक शेवटची असेल…’ – मनसे अध्यक्ष राज ठाकरे

Next Post

भटक्या कुत्रा हल्ल्यात मृत्यू झाल्यास ५ लाखांची नुकसानभरपाई, सरकारचा मोठा निर्णय

Next Post
भटक्या कुत्रा हल्ल्यात मृत्यू झाल्यास ५ लाखांची नुकसानभरपाई, सरकारचा मोठा निर्णय

भटक्या कुत्रा हल्ल्यात मृत्यू झाल्यास ५ लाखांची नुकसानभरपाई, सरकारचा मोठा निर्णय

BreakingNews

७६ व्या वर्षीही फिटनेसचा जलवा; नाना पाटेकर यांचा वर्कआऊट व्हिडिओ व्हायरल

शेतकऱ्यांनो, सज्ज व्हा! आधारकार्डप्रमाणेच आता डिजिटल आयडी अनिवार्य

प्रताप सरनाईकांचा दणका! १५ रुपयांत ‘नाथजल’ न विकल्यास थेट परवाना रद्द करण्याचा इशारा

प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने ठाणे, मिरा-भाईंदरचा कायापालट; लवकरच उभे राहणार ५ स्टार हॉटेल

आता माकड पकडा आणि ६०० रुपये मिळवा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.