Lokrakshanay
Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मार्गशीर्ष महिन्यात पूजा कशी करावी?

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 22, 2025
in ताज्या बातम्या, मनोरंजन
मार्गशीर्ष महिन्यात पूजा कशी करावी?
Share on FacebookShare on Whatsapp

वृत्तसंस्था : भारतीयांचे सण वर्षभर सुरूच असतात आणि सण म्हटलं कि एक वेगळ्याच प्रकारचा उत्सह देखील पाहायला मिळतो. आणि त्यातीलच एक पवित्र महिना म्हणजे मार्गशीर्षचा महिना. आज पासून मार्गशीर्ष महिन्याला सुरवात झाली आहे. कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष हा महिना येतो. हिंदू दिनदर्शिकेनुसार, मार्गशीर्ष हा नववा महिना असतो. हिंदू धर्मात १२ महिने प्रत्येक देवतेला समर्पित केले जातात. त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही तितकेच जास्त महत्व आहे. मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीकृष्णाचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो. तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचे खास व्रत देखील केले जातात. पुराणानुसार, या व्रताचं पालन केल्याने भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा यासोबतच ऐश्वर्य, यश आणि सुख- समृद्धी प्राप्त होते. यासाठी या महिन्यात दर गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रुपाची पूजा केली जाते.या महिन्यात ४ मार्गशीर्ष गुरूवार साजरे केले जातील.

आपल्याकडे जे काही चांगले आहे त्याप्रती सद्भावना ठेवणे आणि समाधान मानणे का महत्त्वाचे आहे हे भद्रश्रवाराजाच्या कथेतून महालक्ष्मीने सांगितले आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या कथेचे पठण देखील केले जाते, आणि ते पठण मार्गशीर्षमधल्या गुरुवारी केले जाते तसेच महालक्ष्मी देवीचा मंत्र जप करून देवीची मनोभावे पूजा केली जाते. मार्गशीर्ष गुरुवारी घट मांडण्याआधी घट मांडणारी जागा स्वच्छ करून रांगोळी काढून घ्यावी. रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावर चौरंग अथवा पाट ठेवावा. चौरंगावर लाल कापड ठेवून त्यावर तांदूळ आणि वर तांब्याचा कलश ठेवावा. कलशाला हळद-कुंकु लावून आत पाणी, अक्षता, दूर्वा, एक नाणं आणि सुपारी ह्या कलशाच्या आत ठेवावी. विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी, पंचपात्र कलशावर ठेवावी आणि त्यावर नारळ ठेवावा. यानंतर चौरंगावर अंथरलेल्या लाल कापडावर थोडे तांदूळ पसरवून त्यावर कलशाची स्थापना करावी, आणि चौरंगावर श्री लक्ष्मीदेवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र देखील ठेवावे. कलशापुढे विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ हे पदार्थ ठेवा. यानंतर विधीवत पूजा करा, आपण आपल्या इच्छेप्रमाणे व शक्य होईल तसा नैवेद्य मनोभावे दाखवून देवीची पूजा करू शकता.

Previous Post

बिग बॉस फेम मराठी अभिनेता शिव ठाकरे यांच्या घराला भीषण आग!

Next Post

कल्याण अर्णव खैरे मृत्युप्रकरण: लोकलमधील मारेकरी प्रवाशांविरूध्द गुन्हा दाखल!

Next Post
कल्याण अर्णव खैरे मृत्युप्रकरण: लोकलमधील मारेकरी प्रवाशांविरूध्द गुन्हा दाखल!

कल्याण अर्णव खैरे मृत्युप्रकरण: लोकलमधील मारेकरी प्रवाशांविरूध्द गुन्हा दाखल!

BreakingNews

२६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या न्यायलढ्याची कहाणी आता चित्रपटातून; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘प्रहार’चा ट्रेलर प्रदर्शित

दुबईहून इस्रायलला जाणाऱ्या विमानाचे अपहरण? ‘त्या’ कोडने अख्खे जग हादरले!

१ ऑक्टोबरला ठाणे जिल्ह्यात ‘एक दिवस, एक तास, एक साथ’ स्वच्छता अभियान; श्रमदानातून स्वच्छ, सुंदर आणि निरोगी गावांचा संकल्प

रायगडमध्ये पहिले ‘स्टार गेजिंग सेंटर’ मारळ येथे होणार; हरिहरेश्वर पर्यटन विकासाचा मास्टरप्लॅन निश्चित!

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा सुवर्णधडाका; महिला कंपाउंड तिरंदाजी संघाने चीनला हरवत पटकावले सातवे सुवर्ण

दुष्काळावर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ६,७२८ कोटींचा निधी; मंत्री भरत गोगावले यांची माहिती

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.