Lokrakshanay
Wednesday, April 29, 2026
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
No Result
View All Result
Lokrakshanay
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER
Home ताज्या बातम्या

मुंबईतील ‘या’ परिसरात MHADA उभारणार ८५ मजली टॉवर

टिम लोकरक्षणाय by टिम लोकरक्षणाय
November 20, 2025
in ताज्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
मुंबईतील ‘या’ परिसरात MHADA उभारणार ८५ मजली टॉवर
Share on FacebookShare on Whatsapp

मुंबई : मुंबई शहरात साधारण दशकभराहून आधीपासूनच पुनर्वसनाची लाट आली. शहरातील बऱ्याच जुन्या चाळींची, दोन ते तीन मजली इमारतींची जागा पाहता पाहता बहुमजली इमारती आणि आता थेच टॉवरनं घेण्यास सुरुवात केली. ज्या मुंबईत घर घेण्याचं अनेकांचच स्वप्न होतं, त्या मुंबईत Real Estate क्षेत्राला अशी काही झळाळी मिळाली की हे शहर सामान्यांच्या अवाक्याबाहेर जाऊ लागलं. मात्र MHADA च्या मदतीनं शहरात हक्काचं घर खरेदी करण्याचं सामान्यांचं स्वप्न तरीही साकार होत राहिलं. याच पावलावर पाऊल ठेवत आता म्हाडाकडून मुंबईतील मोक्याच्या आणि प्रतिष्ठीत अशा परिसरामध्ये एक मोठा गृहप्रकल्प उभारला जाणार आहे. इथं पाहताना अनेकांचीच नजर कुतूहलानं वर जाईल, कारण म्हाडा तब्बल ८५ मजली टॉवर उभारणार असून, आता त्यासाठीची तयारीसुद्धा सुरू झाली आहे.

मुंबईच्या (Worli BDD Chawl) वरळी बीडीडी चाळीतील येथील रहिवाशांसाठी म्हाडाकडून पुनर्वसन इमारतींचं काम सुरू असतानाच दुसरीकडे म्हाडाने लॉटरीच्या माध्यमातून घरांच्या विक्रीसाठी याच परिसरात पाच गगनचुंबी टॉवर उभारण्याची तयारीसुद्धा सुरू केली आहे. प्राथमिक माहितीनुसा यामध्ये दोन टॉवर 58 मजली, तर तीन टॉवर ८५ मजली असणार आहेत. म्हाडाला यासाठी विमानतळ प्राधिकरणाची परवानगीसुद्धा मिळाली असून पर्यावरण विभागाची मंजुरी मिळताच इथं टॉवर उभारणीच्या कामाला सुरुवात होईल. वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग इथं असणाऱ्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचं काम म्हाडा दोन टप्प्यांत पूर्ण करणार आहे. ज्यामध्ये वरळीतील १२१ चाळींमधील ९६८९ रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी ४० मजली ३४ टॉवर उभारले जातील. बीडीडी चाळीतील रहिवाशांच्या पुनर्वसनातून विक्रीयोग्य घरं उभारण्यासाठीसुद्धा म्हाडाला मोठ्या प्रमाणात भूखंड उपलब्ध होणार असून तिथं हे गगनचुंबी टॉवर उभारले जातील. ज्यांतील सदनिकांची विक्री सोडतीच्या माध्यमातून होईल.

Previous Post

क्यूआर कोड नसलेले बेकायदा फलक हटवा, उच्च न्यायालयाचे आदेश

Next Post

हिवाळ्यात केळी खाणे आरोग्याला हानीकारक?

Next Post
हिवाळ्यात केळी खाणे आरोग्याला हानीकारक?

हिवाळ्यात केळी खाणे आरोग्याला हानीकारक?

BreakingNews

प्रताप सरनाईकांच्या पुढाकाराने ठाणे, मिरा-भाईंदरचा कायापालट; लवकरच उभे राहणार ५ स्टार हॉटेल

आता माकड पकडा आणि ६०० रुपये मिळवा; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय!

संजय दत्तला ‘त्या’ अश्लील गाण्याबद्दल पश्चात्ताप; स्वीकारली ५० मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी!

ठाण्यात परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना आता गिरवावे लागणार मराठीचे धडे!

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींचा गौरव

पुण्यात ‘बाल पुस्तक जत्रे’चे आयोजन; ३० एप्रिलपासून मुलांसाठी ज्ञान-मनोरंजनाची मेजवानी

Our Social Handles

Lokrakshanay

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.

Categories

  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

Social Handles

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • LIVE
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आरोग्य
  • E-PAPER

© 2023 Lokrakshanay All Rights Are Reserved.