मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहेत. केवायसीसाठीची मुदत वाढली आहे. आता लाडक्या बहिणी ३१ डिसेंबरपर्यंत केवायसी करु शकतात. महिला बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, केवायसी करण्याची मुदत वाढवून दिली आहे. त्याचसोबत राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
लाडकी बहीण योजनेची केवायसी करताना महिलांना त्यांचे पती किंवा वडिलांचेही केवायसी करायचे असते.ज्या महिलांचे पती आणि वडील हयात नाही, अशा महिलांनी केवायसी कशी करायची असा प्रश्न विचारला जात होता. आता यावर राज्य सरकारने तोडगा काढला आहे. या महिलांसाठी केवायसी प्रक्रियेत बदल केला आहे. लाडकी बहीण योजनेत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाही किंवा घटस्फोट झाला आहे. त्या लाभार्थी महिलांनी वेबसाइटवरुन स्वतःचे केवायसी पूर्ण करावे. त्यानंतर त्यांच्या पती किंवा वडिलांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोटाचे प्रमाणपत्र किंवा मा. न्यायालयाचे आदेश संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे जमा करावेत, यानंतर त्यांची केवायसी पूर्ण होईल. असं आदिती तटकरेंनी सांगितलं आहे.

