वृत्तसंस्था : सूरजनं आयुष्यात अनेक कटू प्रसंग पाहिले घरातले मतभेद, नात्यांमधले ताण, तुटलेले संबंध पण या सगळ्यांनी त्याला कमकुवत न करता उलट त्याच्या जिद्दीला अधिक धार दिली. “हार मानायची नाही” हे वाक्य त्याचं ब्रीद बनलं आणि त्याने स्वतःला सतत पुढे ढकलत राहिला. बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश केल्यानंतर तो केवळ एक स्पर्धक नव्हता; तो घराघरात पोहोचणारा, लोकांच्या मनात बसणारा चेहरा बनला.
त्याची स्पष्टवक्तेपणा, खरेपणा, भावनांमधली सचोटी आणि परिस्थितीशी भिडण्याची हिंमत प्रेक्षकांना भावली. टीका झाली, अनेकदा गैरसमजही झाले, पण तो खचला नाही आणि शेवटी त्याने विजेतेपद आपल्या नावे केलं. बिग बॉसची ट्रॉफी मिळाल्यानंतर सूरजचं आयुष्य अक्षरशः बदललं. आर्थिक सुबत्ता आली, करिअरच्या नव्या दाराचे कुलूप उघडले, आणि चाहत्यांचा अपार पाठिंबा मिळाला. आज त्यांने स्वत:च्या घरात प्रवेश केला आहे. पाहूया त्याचे स्वत;चे हक्काचे घर कसं आहे. सूरजच्या घरासमोरील सुंदर बाग म्हणजे त्याच्या मेहनती प्रवासाचं आणखी एक शांत, सुखद प्रतीक. झोपडपट्टीच्या धुळी, गोंधळ आणि मर्यादित जागेतून बाहेर पडून आज त्याच्याकडे स्वतःची हिरवळ आहे. घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सुंदर हिरवं लॉन आहे. बागेच्या दोन्ही बाजूंना ठेवलेले मॉडर्न सेरामिक आणि टेराकोटा पॉट्स घराच्या सौंदर्यात भर घालतात. घरा जवळील हिरवळ पाहून मनाला शांती मिळते.

